कोल्हापूरच्या शाहूला मिळाला यूथ आॅलिम्पिक कोटा, १० मीटर एअर रायफलमध्ये जिंकले कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:36 AM2017-12-10T00:36:53+5:302017-12-10T00:37:04+5:30

मेहुली घोष आणि शाहू माने यांनी जपानच्या वॉको सिटी येथे १० व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकताना २०१८ च्या युवा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय महिला व पुरुष नेमबाज ठरण्याचा बहुमान मिळवला.

 Bronze winners in Youth Olympic quota, 10 meter air rifle in Shahu, Kolhapur | कोल्हापूरच्या शाहूला मिळाला यूथ आॅलिम्पिक कोटा, १० मीटर एअर रायफलमध्ये जिंकले कांस्य

कोल्हापूरच्या शाहूला मिळाला यूथ आॅलिम्पिक कोटा, १० मीटर एअर रायफलमध्ये जिंकले कांस्य

Next

नवी दिल्ली : मेहुली घोष आणि शाहू माने यांनी जपानच्या वॉको सिटी येथे १० व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकताना २०१८ च्या युवा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय महिला व पुरुष नेमबाज ठरण्याचा बहुमान मिळवला.
मेहुलीने महिला १० मीटर एअर रायफल युवा गटात सुवर्णपदक जिंकतानाच तीन कोटा स्थानांपैकी एक आपल्या नावावर केला, तर कोल्हापूरच्या शाहूने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल युवा गटात कांस्यपदकासह चार कोटा स्थानांपैकी एक प्राप्त केला.
भारताने तीन सुवर्ण, तीन कांस्य पदके जिंकली. पहिल्या दिवशी संघाने पाच पदके जिंकली होती. समीक्षा ढिंगार हिने चीनची प्रतिस्पर्ध्याला नमवताना ज्युनिअर महिला १०
मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. समीक्षाने २४९.६ गुणांसह रौप्यपदक जिंकणाºया यू झांगला २४ शॉटच्या फायनलमध्ये ०.१ गुणाने
मागे टाकले. सिंगापूरच्या मार्टिना लिंडसे वेलोसोने २२७.२ गुणांसह कांस्यपदक जिंकले. भारताची श्रेया सक्सेना १२१.३ गुणांसह आठव्या स्थानावर राहिली.
शाहू युवा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला. त्याने २२८.२ गुणांसह कांस्यपदक जिंकले. चीनच्या चांगहोंगे झांग (२५०) याने सुवर्ण, तर बांगलादेशच्या अर्नब शरारने (२४९.५) रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीत पात्र ठरणाºया हृदय हजारिकाने १२१.१ गुणांसह आठवे स्थान मिळवले. शाहू, हृदय आणि मोहित अग्निहोत्री यांनी १८६३.१ गुणांसह सांघिक सुवर्णपदक जिंकले. मेहुलीनेही भारतासाठी युवा आॅलिम्पक कोटा मिळवला. मेहुली क्वॉलिफाइंगमध्ये ४२०.६ गुणांसह अव्वल स्थानी राहिली आणि फायनलमध्ये सुरुवातीपासून आघाडीवर राहत तिने सुवर्णपदक जिंकले. मेहुली फायनलमध्ये २५०.५ गुणांसह अव्वल स्थानी राहिली. तिने रौप्यपदक जिंकणाºया चीनच्या मिंगवाई गाओ हिला ०.१ गुणाने मागे टाकले. मेहुलीने रक्षणा चक्रवर्ती आणि श्रेया अग्रवाल यांच्या साथीने एकूण १२४०.५ गुणांसह कांस्यपदक जिंकले. चीनने १२५३.१ गुणांसह सुवर्ण आणि कोरियाने १२४१.२ गुणांसह रौप्यपदक जिंकले. (वृत्तसंस्था)

तो गेली दोन वर्षे ज्या जिद्दीने आणि कष्टाने सराव करीत होता त्याची ही यशाची पावती आहे. कोणतेही दडपण न घेतला. त्याने आजची कामिगरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे आम्ही सर्वात खूप आनंदी आहोत. आमच्या वेद रायफल अ‍ॅन्ड पिस्टल शूटिंग अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूचे हे पहिले आंतरराष्टÑीय पदक आहे. शाहूला त्याची सेंट झेव्हियर्स शाळासुद्धा खूप सहकार्य करते. यावर्षी तो १० वी आहे, तरीसुद्धा तो जपानला स्पर्धेसाठी गेला आहे. त्याच्या शाळेतील सर्व शिक्षकसुद्धा त्याचा अभ्यास स्पर्धेनंतर करून घेत असतात, त्यामुळेच त्याने हे मोठे यश संपादन केले. त्याने ज्युनियर गटात भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न जे पाहिले होते ते पूर्ण झाले आहे.
- राधिका बराले (छत्रपती पुरस्कारविजेत्या), शाहूच्या मार्गदर्शिका

शाहू गेल्या दोन वर्षांपासून आमच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. नेहमी नवीन काही तरी शिकण्याचा त्यास ध्यास असतो. त्याचसोबत प्रचंड कष्ट आणि जिद्द या जोरावरच त्याने आपल्यामधील क्षमता सिद्ध केल्या आहेत. सकाळी व सायंकाळी दोन टप्प्यांमध्ये तो सराव करीत आहे.
- रोहित हवालदार, अ‍ॅकॅडमीचे प्रशिक्षक

शाहूची निवड होणे अनपेक्षित होते. त्याच्या निवडीने आम्हाला खूपच आनंद झाला आहे. तो नक्कीच भारतासाठी पदक मिळवून आपल्या देशासह राज्याचे व कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवेल.
- तुषार माने, (शाहू मानेचे वडील )

Web Title:  Bronze winners in Youth Olympic quota, 10 meter air rifle in Shahu, Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा