नवोदित खेळाडूंनी सातत्य राखले पाहिजे
By admin | Published: June 15, 2016 03:52 AM2016-06-15T03:52:44+5:302016-06-15T03:52:44+5:30
युवा क्रिकेटपटूंनी एखाद्या सामन्यातील यशानंतर हुरळून न जाता कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे, असा मोलाचा सल्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अजय शिर्के यांनी
मुंबई : युवा क्रिकेटपटूंनी एखाद्या सामन्यातील यशानंतर हुरळून न जाता कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे, असा मोलाचा सल्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अजय शिर्के यांनी दिला. मंगळवारी चर्चगेट येथील गरवारे हाऊस क्लबमध्ये संपन्न झालेल्या रमेश राजदे शिष्यवृत्ती समारंभात ते बोलत होते.
यंदाच्या १४ वर्षांखालील गटात शंतनू कदमची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली. १६ वर्षांखालील गटात विघ्नेश कदम व १९ वर्षांखालील गटात मिनाद मांजरेकरला निवडले. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व केलेल्या अरमान जाफरला यावेळी विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर म्हणाले, ‘‘युवा खेळाडूंची कामगिरीच त्यांच्याबाबत बोलून गेली पाहिजे. तसेच मिळालेल्या संधीचे सोने कसे करता येईल याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.’’