budget 2021 : क्रीडा आणि युवक कल्याण कार्यक्रमाच्या बजेटला कात्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 02:20 AM2021-02-02T02:20:19+5:302021-02-02T02:20:28+5:30

budget 2021: कोरोना महामारीमुळे वर्षभर क्रीडा आयोजन ठप्प होते. याचा परिणाम क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या रकमेवर झालेला दिसतो.

budget 2021: Cut the budget for sports and youth welfare programs | budget 2021 : क्रीडा आणि युवक कल्याण कार्यक्रमाच्या बजेटला कात्री

budget 2021 : क्रीडा आणि युवक कल्याण कार्यक्रमाच्या बजेटला कात्री

Next

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे वर्षभर क्रीडा आयोजन ठप्प होते. याचा परिणाम क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या रकमेवर झालेला दिसतो. २०२१-२२ चा सोमवारी अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये २५९६.१४ कोटी इतकीच तरतूद केली आहे.
 
मागच्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम २३०.७८ कोटी इतकी कमी आहे. मागच्या वर्षीच्या संशोधित निधीच्या तुलनेत ही रक्कम अधिक असल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला. कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन वर्षभरासाठी स्थगित झाले होते, शिवाय स्थानिक स्पर्धांचे आयोजन रद्द करण्यात आले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना विदेशात सराव करण्याची सोयदेखील नव्हती. ऑलिम्पिक तयारीसाठी खेळाडूंना विदेशात सराव करावा लागतो. त्याचा संपर्ण खर्च केंद्र शासनाकडून केला जातो.

क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानुसार, मागच्या वर्षी सुरुवातीला २८२६.९२ कोटींची तरतूद करण्यात आली होती, नंतर ती रक्कम १८००.१५ कोटी इतकी घटविण्यात आली. कोरोनामुळे क्रीडा आयोजन नसल्याचे यामागे कारण देण्यात आले होते. खेळाच्या पायाभूत सोयी विकसित करण्यास विशेष लक्ष देण्यात आले नव्हते.

राष्ट्रीय क्रीडा विकास कोषाला  २५ कोटी मिळाले आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) ६६०.४१ कोटी रुपये मिळाले आहेत. खेळाडू प्रोत्साहन योजनेची रक्कम  मात्र ७० कोटीहून ५३ कोटी रुपये करण्यात आली. २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनिमित्त उभारण्यात आलेल्या साई स्टेडियमच्या डागडुजीसाठी जी रक्कम लागते ती ७५ वरून ३० कोटी इतकी करण्यात आली आहे. 

खेलो इंडियासाठी २०२०-२१ साठी ८९०.४२ कोटीची तरतूद होती. २०२१-२२ साठी ही रक्कम ६५७.७१ कोटी इतकी असेल. राष्ट्रीय क्रीडा महासंघांना देण्यात येणारा निधी २४५ कोटी रुपये होता. ही रक्कम १३२ कोटीवर आणण्यात आली आहे. पुढच्या आर्थिक वर्षासाठी मात्र २८० कोटी देण्याचे आश्वासन मिळाले आहे.
 

Web Title: budget 2021: Cut the budget for sports and youth welfare programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.