बुलडाण्याच्या महिला पोलिसाचा चीनमध्ये डंका; दोन सुवर्णासह तीन पदके
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 10:27 IST2019-08-20T06:16:35+5:302019-08-20T10:27:17+5:30
मोनिका जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग,सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन, तसेच पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले.

बुलडाण्याच्या महिला पोलिसाचा चीनमध्ये डंका; दोन सुवर्णासह तीन पदके
मुंबई : चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या महिला कॉन्स्टेबल मोनिका जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी करत दोन सुवर्ण पदक व एक कांस्य पदक मिळविले. तिने ‘टार्गेट आर्चरी’मध्ये ७२० पैकी ७१६ गुण मिळवित विक्रम नोंदविला.
चेंगडू येथे ८ ते १८ आॅगस्ट दरम्यान या स्पर्धा झाल्या. यामध्ये मोनिकाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले. मोनिका बुलडाणा पोलीस दलात कार्यरत असून आंतरराष्टÑींय खेळाडू आहे. फिर्ल्ड आर्चरीमध्ये सुवर्ण, तर ‘थ्रीडी’ आर्चरी प्रकारात कांस्य पदक मिळविले. मोनिका २०१३ मध्ये पोलीस दलात भरती झाली असून मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करीत जागतिक स्तरावर नववे स्थान मिळविले होते.
मोनिका जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग,सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन, तसेच पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले.