बटलरचे तुफान, न्यूझीलंडला विजयासाठी 311 धावांचे आव्हान

By admin | Published: June 6, 2017 07:46 PM2017-06-06T19:46:04+5:302017-06-06T19:56:00+5:30

सावध सुरुवातीनंतर अ‍ॅलेक्स हेल्स, ज्यो रूट, आणि बटलरच्या अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने न्यूझीलंडला विजयासाठी 311 धावा धावांचे आव्हान दिले आहे.

Butler storm, New Zealand chasing 311 for victory | बटलरचे तुफान, न्यूझीलंडला विजयासाठी 311 धावांचे आव्हान

बटलरचे तुफान, न्यूझीलंडला विजयासाठी 311 धावांचे आव्हान

Next

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 6 - सावध सुरुवातीनंतर अ‍ॅलेक्स हेल्स, ज्यो रूट, आणि बटलरच्या अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने न्यूझीलंडला विजयासाठी 311 धावा धावांचे आव्हान दिले आहे. सलमी बल्लेबाज जेसन रॉय झटपट बाद झाल्यानंतर हेल्स आणि रुटने सावध पवित्रा घेत संघाची धावसंख्या हलती ठेवली. हेल्स आणि रुटने दुसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागिदारी केली. धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात हेल्स 56 धावांवर बाद झाला. हेल्स बाद झाल्यानंतर कर्णधार मॉर्गन मैदानावर आला. पण त्याला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयश आले. मॉर्गन आवघ्या 13 धावांवर बाद. मॉर्गननंतर जम बसलेला रुटही मागारी परतला. रुटने 64 धावांचे योगदान दिले. झटपट गडी बाद होत असल्याने धावसंखेला खिळ बसली होती. यावेळी स्टोक्स आणि बटलरने सामंजस्याने फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. बेन स्टोक्सने 48 धावा करताना बटलरला चांगली साथ दिली. बटलरने तुफानी फटकेबाजी करताना 48 चेंडूत 61 धावांची खेळी केली. बटलर, अ‍ॅलेक्स हेल्स, ज्यो रूट आणि स्टोक्स शिवाय इंग्लंडच्या एकाही खेळाडूला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. हाणामारीच्या षटकात नियमित अंतरावर गडी बाद झाल्यामुळे धावगतीला वेसन बसले. न्यूझीलंडकडून मिल्ने, कोरी अँडरसन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. साउदीने दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. ट्रेंट बोल्ट आणि मिशेल सँटनेरला प्रत्येकी एका बळीवर समाधान मानावे लागले.

Web Title: Butler storm, New Zealand chasing 311 for victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.