सीए, बीसीसीआयने पाहिल्या कसोटीचा निर्णय घ्यावा : गावसकर
By admin | Published: November 28, 2014 01:27 AM2014-11-28T01:27:16+5:302014-11-28T01:27:16+5:30
पहिली कसोटी खेळवायची किंवा नाही याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए)यांनी घ्यावा असे मत व्यक्त केले आह़े
Next
नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिज ह्युज याच्या दु:खद निधनानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी पहिली कसोटी रद्द करण्याची मागणी होत असताना भारताचा माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी या दोन्ही देशातील पहिली कसोटी खेळवायची किंवा नाही याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए)यांनी घ्यावा असे मत व्यक्त केले आह़े
गावसकर पुढे म्हणाले, दोन्ही संघातील खेळाडू ह्युजच्या मृत्युनंतर पहिल्या कसोटीत खेळण्याच्या मनस्थितीत आहेत असे वाटत नाही़ विशेष म्हणजे ह्युज याला मैदानावरून बाहेर घेऊन गेल्यानंतर न्यू साउथवेल्स आणि साउथ ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता़ त्यामुळे बीसीसीआय आणि सीएने पहिल्या कसोटीबद्दल निर्णय घेणो आवश्यक आह़े
गावसकर यांनी पुढे सांगितले की, एखाद्या खेळाडूचा मैदानात
खेळताना मृत्यु व्हावा असे कुणालाच वाटत नाही़ किंवा एखादा खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूला इजा पोहोचण्याच्या इराद्याने गोलंदाजी करीत नाही़ मात्र आता या घटनेनंतर खेळाडूंनी खेळताना काळजी घेणो अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही हा माजी क्रिकेटपटू म्हणाला़ (वृत्तसंस्था)