राष्ट्रकुल स्पर्धेतून कॅमेरूनचे खेळाडू बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:36 AM2018-04-12T03:36:05+5:302018-04-12T03:36:05+5:30
संकटाचा सामना करणाऱ्या कॅमेरुनचे पाच खेळाडू आॅस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या क्रीडाग्राममधून अचानक बेपत्ता झाले.
Next
गोल्ड कोस्ट : संकटाचा सामना करणाऱ्या कॅमेरुनचे पाच खेळाडू आॅस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या क्रीडाग्राममधून अचानक बेपत्ता झाले. त्यात तीन भारोत्तोलक आणि दोन बॉक्सर्सचा समावेश आहे. मायदेशी न परतण्याच्या इराद्याने त्यांनी क्रीडाग्राम सोडल्याचा संशय असून आॅस्ट्रेलियन पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
कॅमेरुनचे मीडिया अधिकारी सायमन मोलोम्बे यांनी दिलेल्या माहितीनुसार : भारोत्तोलकांची नावे आॅलिव्हर माटम, आर्केझेलिन फौदजी आणि पेटिट सिकाम्बा अशी आहेत.