...तर पाकला दंड होऊ शकतो : शहरयार
By Admin | Published: February 19, 2016 02:51 AM2016-02-19T02:51:59+5:302016-02-19T02:51:59+5:30
भारतात पुढील महिन्यात आयोजित टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघ सहभागी न झाल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद पाकला दंड ठोठावू शकते, अशी कबुली पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी दिली.
कराची : भारतात पुढील महिन्यात आयोजित टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघ सहभागी न झाल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद पाकला दंड ठोठावू शकते, अशी कबुली पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी दिली.
लाहोरमध्ये मीडियाशी बोलताना शहरयार म्हणाले, ‘‘पाक संघ टी-२० विश्वषकात खेळला नाही तर आयसीसी आमच्या संघाला दंड ठोठावू शकेल. मी पंतप्रधानांच्या सचिवालयाशी बोललो, पण सरकारने टी-२० विश्वचषकासाठी संघ भारतात पाठविण्यास अद्याप मंजुरी दिलेली नाही. आयसीसीकडून आमच्यावर दडपण येत असल्याचे किंवा पंतप्रधानांनी दौऱ्यास मंजुरी प्रदान केल्याचे वृत्त खोडसाळ आहे.’’ ते पुढे म्हणाले, की आम्ही सरकारला मंजुरी आणि सल्ला मागितला आहे. पंतप्रधान कार्यालयाने, आम्ही परिस्थितीची माहिती घेत असून, लवकरच कळविण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही टी-२० विश्वषकात खेळलो नाही तर आयसीसी मोठा दंड आकारेल हे निश्चित.