अजुनही 140 पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करू शकतो: नेहरा

By admin | Published: March 12, 2017 09:40 PM2017-03-12T21:40:35+5:302017-03-12T21:40:35+5:30

आशिष नेहराची कारकीर्द संपुष्टात आली आहे, असे ज्यावेळी म्हटल्या जाते त्यावेळी हा वेगवान गोलंदाज दमदार पुनरागमन करत टीकाकारांना गप्प करतो

Can still bowl at 140 plus pace: Nehra | अजुनही 140 पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करू शकतो: नेहरा

अजुनही 140 पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करू शकतो: नेहरा

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - आशिष नेहराची कारकीर्द संपुष्टात आली आहे, असे ज्यावेळी म्हटल्या जाते त्यावेळी हा वेगवान गोलंदाज दमदार पुनरागमन करत टीकाकारांना गप्प करतो. या वयातही मी वेगवान गोलंदाजच आहे, असे नेहराचे मत आहे. 
नेहराने सांगितले की,‘पुढील महिन्यात मी वयाची ३८ वर्षे पूर्ण करणार आहे. मी आताही वेगवान गोलंदाजच आहे. मी कधीच १२५ ते १२८ किलोमीटर प्रती तास वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज नव्हतो. आजही मी नव्या चेंडूने १३८ किलोमीटर प्रती तास वेगाने गोलंदाजी करण्याचे लक्ष्य ठरवतो. वेग सर्वकाही नसला तरी गरज पडली तर टी-२० मध्ये १४० पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करू शकतो.’
महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांना जो नेहरा संघात हवा होता तोच नेहरा विद्यमान कर्णधार विराट कोहलीला हवा असतो. त्याचे अतिरिक्त दडपण जाणवते का?  याबाबत बोलताना नेहरा म्हणाला,‘आंतरराष्ट्रीय पातळीवर दडपण जाणवत नाही, असे जर कुणी म्हणत असेल तर तो नक्कीच खोटं बोलत असतो. पण, कारकिर्दीच्या या टप्प्यात माझ्यावर दडपणापेक्षा सीनिअर क्रिकेटपटू असल्यामुळे जबाबदारी अधिक असते. त्यामुळे युवा गोलंदाजांना सल्ला देणे व त्यांना मदत करण्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी सज्ज असतो.’
नेहरा म्हणाला,‘मी आणि धोनी वेगवेगळ्या वयाचे दोन खेळाडू आहोत. आमचे काम अनुभवाच्या जोरावर संघाला स्थैर्य प्रदान करण्याचे आहे.’ भारताला २०१९ च्या ५० षटकांच्या विश्वकप स्पर्धेसाठी संघात नेहरा हवा असेल तर काय योजना आहे.  या प्रश्नावर नेहरा हसला. तो म्हणाला,‘२०१९ ला अद्याप बराच वेळ आहे. माझ्या वयाचा विचार करता मी एवढे दिवस खेळू शकणार नाही. ज्यावेळी मी युवा होतो त्यावेळीही मी कुठली योजना आखली नव्हती. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी ज्युनिअर असलेला महेंद्रसिंग धोनीही फार लांबचा विचार करीत नाही. सध्या मी आयपीएलसाठी तयारी करत आहे. कारण दिल्ली संघ हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यात अपयशी ठरला. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे.’
   
 

Web Title: Can still bowl at 140 plus pace: Nehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.