80 वर्षांच्या 'तरुणा'ची कमाल; राष्ट्रकुलमध्ये पदार्पणातच केला विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 01:46 PM2018-04-10T13:46:30+5:302018-04-10T13:46:30+5:30

ज्या वयामध्ये लोक घरी बसून आराम करतात त्याच वयामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण केलं आहे. 

Canadian Commonwealth Games athlete, 79, a hijacking hero | 80 वर्षांच्या 'तरुणा'ची कमाल; राष्ट्रकुलमध्ये पदार्पणातच केला विक्रम

80 वर्षांच्या 'तरुणा'ची कमाल; राष्ट्रकुलमध्ये पदार्पणातच केला विक्रम

Next

गोल्ड कोस्ट - ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सध्या 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत 79 वर्ष 9 महिन्याच्या एका तरुण खेळाडूनं राष्ट्रकुलमध्ये पदार्पण केलं आणि पदार्पणातच मोठा विक्रम केला. ज्या वयामध्ये लोक घरी बसून आराम करतात त्याच वयामध्ये कॅनडाच्या रॉबर्ट पिटकेयर्न यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण केलं आहे. 

रॉबर्ट पिटकेयर्न राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणारे सर्वात वयस्कर खेळाडू ठरले आहे.  पिटकेयर्न यांनी क्वींज प्राइज पेयर्स फाइनल्समध्ये सहभाग नोंदवला होता. पिटकेयर्न आणि त्यांचा जोडीदार निकोल रोसिग्नोल नवव्या स्थानावर राहिले. 79 वर्ष 9 महिने म्हणजे जवळपास 80 व्या वर्षी रॉबर्ट पिटकेयर्न यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेत विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडच्या डोरीन फ्लँडर्सचा विक्रम त्यांनी मोडला आहे. 
  
रॉबर्ट पिटकेयर्न 1988मध्ये ते कॅनडाच्या एअर फोर्समधून निवृत्त झाले. ते पायलट या पदावर कार्यरत होते. राष्ट्रकुल स्पर्धेतील सहभागानंतर माध्यमांशी बोलताना रॉबर्ट पिटकेयर्न यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, शुटींगच्या करियरमधील ही माझी सर्वात मोठी कामगीरी आहे. 

1974मध्ये एका अपहरणाचाही सामना केला होता. त्यावेळी एका प्रवाशाने एअर होस्टेसवर चाकूने वार करत साइप्रसमध्ये जाण्याची मागणी केली होती. त्यावेळी रॉबर्ट यांनी मोठ्या हिंमतीने त्याचा सामना केला होता. रॉबर्ट यांनी कॅनडा एअर फोर्समध्ये तीस वर्ष आपली सेवा दिली आहे. 

Web Title: Canadian Commonwealth Games athlete, 79, a hijacking hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.