‘कॅप्टन कूल’ ते ‘कॅप्टन अॅग्रेसिव्ह’
By admin | Published: January 7, 2017 06:41 AM2017-01-07T06:41:38+5:302017-01-07T06:41:38+5:30
कॅप्टन कूल धोनीच्या यशस्वी पर्वानंतर आता टीम इंडियाची धुरा ‘कॅप्टन अॅग्रेसिव्ह’ विराट कोहलीकडे सोपवण्यात आली
Next
मुंबई- कॅप्टन कूल धोनीच्या यशस्वी पर्वानंतर आता टीम इंडियाची धुरा ‘कॅप्टन अॅग्रेसिव्ह’ विराट कोहलीकडे सोपवण्यात आली आहे. निवड समितीने शुक्रवारी विराटची क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत कर्णधारपदी निवड केली. धोनीने कायम तंदुरुस्त
खेळाडूंना प्राधान्य दिले. विराटचे तंदुरुस्तीसह अनुभवाकडेही लक्ष असल्याचं युवी, नेहराची निवड दर्शविते. आक्रमकता कायमच आॅस्ट्रेलियाकडे दिसते. ती टीम इंडियात येईल. स्टार अष्टपैलू युवराज सिंग आणि अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांचे संघात पुनरागमन झाले. मुंबईकर अजिंक्य रहाणेला एकदिवसीय संघात स्थान मिळाले असले तरी टी-२० संघातून मात्र त्याला वगळण्यात आले आहे.