‘कॅप्टन कूल’ धोनी पत्रकारांवर भडकला

By admin | Published: March 25, 2016 01:57 AM2016-03-25T01:57:23+5:302016-03-25T01:57:23+5:30

शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी याचा रुद्रावतार अनुभवला तो थेट पत्रकारांनी. बुधवारी बांगलादेशवर मिळवलेल्या थरारक विजयानंतर झालेल्या पत्रकार

'Captain Cool' Dhoni blamed journalists | ‘कॅप्टन कूल’ धोनी पत्रकारांवर भडकला

‘कॅप्टन कूल’ धोनी पत्रकारांवर भडकला

Next

बंगळुरू : शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी याचा रुद्रावतार अनुभवला तो थेट पत्रकारांनी. बुधवारी बांगलादेशवर मिळवलेल्या थरारक विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर धोनीचा पारा चढला. या वेळी त्याने सडेतोड उत्तर देताना पत्रकार परिषदेत गंभीर वातावरण निर्माण केले.
या रोमांचक सामन्यानंतर धोनीला एका पत्रकाराने विचारले, ‘‘उपांत्य फेरीसाठी भारताला मोठ्या अंतराने जिंकण्याची आवश्यकता होती. त्यामुळे या निसटत्या विजयावर तू समाधानी आहेस का?’’
यावर धोनीने स्पष्ट उत्तर देताना सांगितले, की ‘‘मला माहिती आहे तुम्हाला भारताच्या विजयावर आनंद झालेला नाही.’’ धोनीच्या या पहिल्याच फटक्यावर त्या पत्रकाराने आपला प्रश्न समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला मध्येच थांबवत धोनी म्हणाला, ‘‘माझं ऐका, तुमचा आवाज, तुमच्या बोलण्याची पद्धत आणि तुमचा प्रश्न हे सर्व काही स्पष्ट करतं, की तुम्हाला भारताच्या विजयाचा आनंद झालेला नाही. सामन्यात कोणतीही स्क्रीप्ट नसते.’’
‘‘नाणेफेक गमावल्यानंतर आम्ही इतक्या कमी धावा करण्याचे कारण काय, यावर तुम्ही विश्लेषण करायला पाहिजे. जर तुम्ही बाहेर बसून हे विश्लेषण करीत नसाल तर मग तुम्ही प्रश्न नको करायला,’’ असेही धोनी म्हणाला. यानंतर काही वेळ शांतता पसरली आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न-उत्तरे असा खेळ रंगला.

पांड्याचे अभिनंदन
ज्याप्रमाणे आम्ही रणनीती आखली होती, त्याप्रमाणेच पांड्याने गोलंदाजी केली. अंतिम षटकावेळी पांड्याला यॉर्कर चेंडू न टाकण्याची सूचना केली होती. कारण यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात चेंडू फुलटॉस होऊ शकतो. त्यामुळे फक्त बॅक आॅफ लेंग्थ चेंडू टाकण्यास सांगितले होते व पांड्याने तशीच गोलंदाजी केली,’’ असेही धोनी म्हणाला.

Web Title: 'Captain Cool' Dhoni blamed journalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.