'कॅप्टन' कूकने दिला राजीनामा
By admin | Published: February 6, 2017 03:36 PM2017-02-06T15:36:50+5:302017-02-06T19:26:54+5:30
. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवामुळे सातत्याने टीकेचे लक्ष्य होत असलेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलेस्टर कूकने आपल्या पदाचा
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 6 - कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 अशा तिन्ही प्रकारात झालेल्या दारुण पराभवामुळे पूर्णपणे निराशाजनक ठरलेल्या भारत दौऱ्यानंतर इंग्लंड क्रिकेटला अजून एक मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवामुळे सातत्याने टीकेचे लक्ष्य होत असलेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलेस्टर कूकने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
"गेली 5 वर्षे इंग्लंडचे नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्माननीय होते. कर्णधारपद सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी कठीण होता, पण हा निर्णय माझ्यासाठी आणि इंग्लिश संघासाठी योग्य आहे असे मला वाटते," असे कूकने कप्तानी सोडल्यानंतर सांगितले.
कूकने 59 कसोटी सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व केले होते. डावखुरा फलंदाज म्हणून संघासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या कूकची कप्तानी कारकीर्द चढ-उतारपूर्ण राहिली. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2013 आणि 2015 साली झालेल्या अॅशेस मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. तसेच दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका आदी संघांनाही कूकच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने पराभूत केले होते. पण 2013मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅसेस मालिका, तसेच गतवर्षी पाकिस्तान आणि भारताविरुद्घच्या मालिकांमध्ये इंग्लंडला दारुण पराभव पत्करावा लागला होता.
Alastair Cook steps down from his role after 59 tests as England Test captain.
— ANI (@ANI_news) February 6, 2017