विराट क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा 'कॅप्टन ऑफ द इयर'

By Admin | Published: December 27, 2016 06:04 PM2016-12-27T18:04:47+5:302016-12-27T18:04:47+5:30

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या यावर्षीच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून विराटची निवड केली आहे.

Captain of the Year | विराट क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा 'कॅप्टन ऑफ द इयर'

विराट क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा 'कॅप्टन ऑफ द इयर'

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मेबलबर्न, दि. 27 -  भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी आणि कप्तानीची भूरळ आता परदेशी क्रिकेटप्रेमीनाही पडू लागली आहे. आता तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या यावर्षीच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून विराटची निवड केली आहे.  त्याआधी आयसीसीने निवडलेल्या यावर्षीच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वसुद्धा  विराटकडे सोपवण्यात आले होते. 
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला यावर्षीचा एकदिवसीय संघ आज जाहीर केला. आश्चर्याची बाब म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथऐवजी विराट कोहलीकडे सोपवले आहे. विराटबरोबरच जसप्रीत बुमराहलाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात स्थान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डि काँक, इंग्लंडचा जोस बटलर, पाकिस्तानचा बाबर आझम यांचीही या संघात निवड करण्यात आली आहे. 
 "विराट यावर्षी केवळ 10 एकदिवसीय सामनेच खेळला, पण या दहा सामन्यांपैकी 8 डावांत त्याने 45 हून अधिक धावांच्या खेळी केल्या. धावांचा पाठलाग करताना भारताने मिळवलेल्या 59 विजयांमध्ये विराटच्या फलंदाजीची सरासरी 90.10 इतकी आहे," असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विराटची निवड करताना म्हटले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेला एकदिवसीय संघ पुढील प्रमाणे आहे. 
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ :  विराट कोहली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, क्विंटन डिकाँक, स्टीव्हन स्मिथ, बाबर आझम, मिचेल मार्श, जोस बटलर, जसप्रीत बुमराह, इम्रान ताहीर. 

Web Title: Captain of the Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.