कार्लोस ब्रेथवेट वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो
By Admin | Published: April 3, 2016 11:05 PM2016-04-03T23:05:26+5:302016-04-03T23:05:26+5:30
कार्लोस ब्रेथवेटने ने सलग ४ षटकार लगावत त्यावर कळस बांधण्याच काम त्याने चोख बजावल. त्यामुळे टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या विजयाचा खरा मानकरी तोच आहे
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ३ - इंग्लंडने दिलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरवात निराशजनक झाली पण मर्लोन सॅम्युअल्सने नाबाद ८५ धावांची खेळी करत विजयचा पाया रचला आणि कार्लोस ब्रेथवेटने ने सलग ४ षटकार लगावत त्यावर कळस बांधण्याच काम त्याने चोख बजावल. त्यामुळे टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या विजयाचा खरा मानकरी ठरला आहे. विंडिजला विजयासाठी शेवटच्या षटकात १९ धावांची गरज असताना स्ट्राइकवर कार्लोस ब्रेथवेटने होता. तो नुकताज मैदानावर आला होता त्यामुळे त्याला स्थरावयालाही वेळ नव्हता. त्यांने विंडिजचिया गोलंदाजीवर आक्रमण करताना शेवटच्या ४ चेंडूवर चार षटकार लगावत अश्याक्याप्राय विजय मिळवला.
त्यापुर्वी गोलंदाजी करतानाही कार्लोस ब्रेथवेटनेने आपली कमाल दाखवली होती. त्याने आपल्या ४ षटकाच्या गोलंदाजीत २३ धावा देत ३ फलंदाजांना बाद केले. त्याने रुट, बटलर आणि डेविड विलेला बाद करत विंडिजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
> वेस्ट इंडिज फलंदाजीच्या शेवटच्या १२ चेंडूचा थरार
- वेस्ट इंडिजला विजयासाठी १२ चेंडूत २७ धावांची गरज
- १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सॅम्युअल्सने खेचला खणखणीत चौकार, दुसऱया चेंडूवर एक धाव, तिसऱया चेंडूवर पुन्हा एक धाव, चौथ्या चेंडूवर एक धाव, पाचव्या चेंडूवर एक धाव आणि सहाव्या चेंडू निर्धाव.
- वेस्ट इंडिजला विजयासाठी ६ चेंडूत १९ धावांची गरज
- २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कालरेस ब्रेथवेटचा खणखणीत षटकार, वेस्ट इंडिजला विजयासाठी ५ चेंडूत १३ धावांची गरज
- ब्रेथवेटचा आणखी एक उत्तुंग षटकार, वेस्ट इंडिजला विजयासाठी ४ चेंडूत ७ धावांची गरज
- ब्रेथवेटचा लागोपाठ तिसरा षटकार, वेस्ट इंडिजला विजयासाठी केवळ १ धाव गरज
- ब्रेथवेट वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो, लागोपाठ चौथा षटकार. रोमांचक सामन्यात वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर चार विकेट्सने विजय.