कॅरोलिना पहिल्या फेरीतच बाहेर
By admin | Published: June 30, 2016 05:53 AM2016-06-30T05:53:44+5:302016-06-30T05:53:44+5:30
माजी नंबर वन खेळाडू डेन्मार्कची कॅरोलिना वोज्नियाकीला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
लंडन : जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू डेन्मार्कची कॅरोलिना वोज्नियाकीला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
कॅरोलिनाचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले. पुरुषांच्या एकेरीत जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेला गत चॅम्पियन सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने फ्रान्सच्या अँड्रीयन मॅनारिनोचा ६-४, ६-३, ७-६ असा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. जोकोविचचा हा सलग तिसावा विजय होता.
वर्षाभरापासून दुखापतीच्या कारणास्तव खराब फॉर्ममध्ये असलेल्या १४व्या मानांकति कॅरोलिनाला स्वेतलानाने सरळ दोन सेटमध्ये ७-५, ६-४ गुणांनी पराभूत करून घरचा रस्ता दाखविला. पहिल्या सेटमध्ये कॅरोलिनाने चांगली लढत दिली; पण तिला तो सेट गमवावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये कुझनेत्सोव्हा एक वेळ ५-१ गुणांनी आघाडीवर होती. परंतु, नंतर कॅरोलिनाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून बरोबरी साधली. नंतर स्वेतलानाने नेटजवळ काही चांगले प्लेसिंग आणि जोरात फटके मारून गुण संपादन केले. शेवटी दुसरा सेटसुद्धा स्वेतलानाने जिंकला. या पराभवामुळे कॅरोलिनाने गेल्या
आठ वर्षांत प्रथमच ५० पेक्षा जास्त होणार आहे.
पुरुषांच्या एकेरीत चेक गणराज्याचा टॉमस बर्डीचने क्रोएशियाच्या इव्हान डोडिंगचा चुरशीच्या ३ तास २४ मिनिटे चाललेल्या लढतीत ७-६, ५-७, ६-१, ७-६ गुणांनी पराभव केला. (वृत्तसंस्था)