स्थानिक पातळीवरील प्रशिक्षकांनाही रोख पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 02:49 AM2018-01-16T02:49:18+5:302018-01-16T02:49:22+5:30

खेळाडूंच्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेले रोख पारितोषिकाची रक्कम आता केवळ पदक विजेते खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांपुरताच

Cash prize for local trainers | स्थानिक पातळीवरील प्रशिक्षकांनाही रोख पारितोषिक

स्थानिक पातळीवरील प्रशिक्षकांनाही रोख पारितोषिक

Next

नवी दिल्ली : खेळाडूंच्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेले रोख पारितोषिकाची रक्कम आता केवळ पदक विजेते खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांपुरताच मर्यादित राहणार नाही. या रक्कमेचा फायदा स्थानिक पातळीवरील प्रशिक्षकांनाही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सोमवारी खेलो इंडियाचे गीत आणि शुभंकराचे अनावरण केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, ‘जेव्हा पण कधी खेळाडू राष्ट्रकुल, आशियाई आणि ओलिम्पिक पदक मिळवत होता, तेव्हा त्याच्या प्रशिक्षकाला प्रोत्साहन मिळत होते. पण आता आम्ही यामध्ये बदल करत आहोत. या रोख पारितोषिकातील २० टक्के
भाग यापुढे खेळाडूंसह स्थानिक पातळीवर कार्य करणाºया प्रशिक्षकांना देण्यात येईल. त्याचप्रमाणे खेळाडूंच्या प्रगतीमध्ये योगदान देणाºया दुसºया प्रशिक्षकांना ३० टक्के देण्यात येईल.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Cash prize for local trainers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.