‘खेलो इंडिया’ विजेत्यांना रोख पुरस्कार, क्रीडामंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 01:36 AM2020-01-28T01:36:45+5:302020-01-28T01:36:59+5:30
महाराष्टÑाच्या ५९० खेळाडूंनी २० पैकी १९ खेळात स्पर्धेत भाग घेतला होता.
नागपूर : गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या तिसऱ्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत अव्वल स्थान पटकविणाºया महाराष्टÑातील ३९९ खेळाडूंना एकूण ३ कोटी ६ लाख २५ हजार रूपयांचे रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत.
वैयक्तिक तसेच सांघिक प्रकारात सुवर्ण विजेत्या ७८ खेळाडूंना प्रत्येकी १ लाख, रौप्य विजेत्या ७७ खेळाडूंना प्रत्येकी ७५ हजार आणि कांस्य विजेत्या १०२ खेळाडूंना प्रत्येकी ५० हजाराचा रोख पुरस्कार दिला जाईल. खेळाडूंचा गौरव सोहळा मुंबईत लवकरच होणार असून त्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून सोहळ्याची तारीख निश्चित करणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी सोमवारी नागपुरात दिली.
महाराष्टÑाच्या ५९० खेळाडूंनी २० पैकी १९ खेळात स्पर्धेत भाग घेतला होता. राज्याने सर्वाधिक ४६ पदकांची कमाई जलतरणात केली असून जिम्नॅस्टिक्समध्ये ४०,कुस्तीमध्ये ३१, अॅथलेटिक्समध्ये २९ आणि वेटलिफ्टिंगमध्ये २५ पदकांचा प्रामुख्याने समावेश आहे. नागपूर विभागातील २० खेळाडूंचा पदक विजेत्यांमध्ये समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘२०१२ ला क्रीडा धोरणाचा आढावा घेण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. समितीने केलेल्या शिफारसीनुसार बºयाच गोष्टी अपेक्षित होत्या, मात्र आधीच्या शासनाकडून अनेक गोष्टींची प्रत्यक्षात अंमलबजावणी का झाली नाही, याचा आढावा लवकरच घेण्यात
येईल.’
नागपूर विभागात सहसंचालकाचे पद असावे, अशी अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. याकडे लक्ष वेधले असता क्रीडामंत्र्यांनी यासंदर्भात शासनस्तरावर निर्णयासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले.
- गेल्यावर्षी पुण्यात झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राने पहिल्यांदा सांघिक जेतेपद पटकावले होते. यंदा गुवाहाटीत आपले जेतेपद कायम राखताना महाराष्ट्राने हरयाणाला रोखले.