नरसिंग यादव प्रकरणात सीबीआय धारेवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 04:06 AM2019-01-22T04:06:10+5:302019-01-22T04:06:18+5:30

कुस्तीगीर नरसिंग यादव याने दिल्ली उच्च न्यायालयात सीबीआयने आपल्यावरील डोपिंग आरोप प्रकरणाची चौकशी पूर्ण केली नसल्याची तक्रार केली होती.

CBI arrests Narasimha Yadav | नरसिंग यादव प्रकरणात सीबीआय धारेवर!

नरसिंग यादव प्रकरणात सीबीआय धारेवर!

Next

नवी दिल्ली : कुस्तीगीर नरसिंग यादव याने दिल्ली उच्च न्यायालयात सीबीआयने आपल्यावरील डोपिंग आरोप प्रकरणाची चौकशी पूर्ण केली नसल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवर दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला धारेवर धरले. एवढेच नव्हे, तर हे प्रकरण डीआयजी रॅँक अधिकाऱ्यांनी हाताळावे तसेच त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असा निर्देशही दिला.
सुनीवणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, ‘जेव्हापासून नरसिंगने तक्रार दाखल केली तेव्हापासून सीबीआयने काय केले? आतापर्यंत कोणतीच कारवाई का झाली नाही, तुम्ही गेल्या अडीच वर्षांपासून काय करीत आहात? हे सीबीआय आहे, कोणती एजन्सी नव्हे. सीबीआयला याची कल्पना असायला हवी की कुस्ती किंवा बॉक्सिंगसारख्या खेळातील खेळाडूंजवळ करिअरसाठी खूप कमी वेळ असतो. खेळाडूंचा गांभीयार्ने विचार व्हावा.’
नरसिंगने आपल्या तक्रारीत आरोप लावला की, त्याच्या जेवणात प्रतिबंधित पदार्थ मिसळला गेला होता. त्यामुळे त्याच्यावर डोपिंगची कारवाई झाली आणि चार वर्षांची बंदी लादण्यात आली. या प्रकरणासंदर्भात, न्यायमूर्ती नजमी वजीरी यांनी आज म्हटले की, सीएएसने या खेळाडूला डोपिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्लीन चिट दिली नव्हती. विश्व डोपिंग विरोधी एजन्सीने हा निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे त्याने तक्रार नोंदवली होती. त्याने केंद्रीय गुन्हे अन्वेशनकडे (सीबीआय) विचारणा केली की गेल्या अडीच वर्षांत कोणतीच कारवाई का झाली नाही. यावर न्यायालयाने सीबीआयला नोटिस जारी करीत एक फेब्रवारी रोजी होणाºया सुनावणीपर्यंत सर्व चौकशी करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, सीएएसच्या निर्णयापूर्वी नाडाने नरसिंह याला २०१६ मध्ये रियो आॅलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती. त्याने पुरुषांच्या ७४ किलो फ्रीस्टाइलप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Web Title: CBI arrests Narasimha Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.