नरसिंगप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी?
By Admin | Published: September 7, 2016 03:44 AM2016-09-07T03:44:22+5:302016-09-07T03:44:22+5:30
डोपिंगमध्ये दोषी असलेला मल्ल नरसिंग यादव याच्या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडून व्हावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंगळवारी जाहीर केले.
लखनौ : डोपिंगमध्ये दोषी असलेला मल्ल नरसिंग यादव याच्या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडून व्हावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंगळवारी जाहीर केले.
नरसिंगने आज अखिलेश यांची भेट घेत आपबिती कथन केली. त्याच्यासोबत झालेल्या कथित अन्यायाबद्दल अखिलेश यांनी सहानुभूती दाखवित या प्रकरणाची सविस्तर चौकशी सीबीआयद्वारे
व्हावी, अशी आपण केंद्र
शासनाला विनंती करणार असल्याचा शब्द दिला.
या प्रकरणातील तथ्य पुढे यावे, शिवाय जे दोषी असतील त्यांना कठोर शासन व्हावे हा यामागे हेतूृ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. सीबीआय तपासामुळे भविष्यात कुण्याही खेळाडूसोबत असा अन्यायकारक प्रकार घडणार नाही, असे आपले मत आहे.