रिओ ऑलिम्पिकचा दिमाखदार निरोप सोहळा

By admin | Published: August 22, 2016 08:00 AM2016-08-22T08:00:52+5:302016-08-22T09:02:48+5:30

माराकाना स्टेडियमवर ३१व्या ऑलिम्पिक महाकुंभाचा निरोप सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला, ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा अमेरिकेने आपलाच दबदबा असल्याचं सिद्ध केल.

The celebrated holiday celebrations of the Rio Olympics | रिओ ऑलिम्पिकचा दिमाखदार निरोप सोहळा

रिओ ऑलिम्पिकचा दिमाखदार निरोप सोहळा

Next
- ऑनलाइन लोकमत
रिओ दी जानेरो, दि. 22 -  ३१व्या ऑलिम्पिक महाकुंभाचा निरोप सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. 16 दिवस चाललेल्या या स्पर्धेची सुरुवात ज्या दिमाखाने करण्यात आली होती त्याच थाटात निरोप सोहळाही पार पाडला गेला. 2020 ऑलम्पिकसाठी टोकियोकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. माराकाना स्टेडियमवर निरोप सोहळा पार पडला. यावेळी उद्घाटनावेळी दाखवण्यात आल्याप्रमाणे पुन्हा एकदा ब्राझिलच्या संस्कृतीची ओळख करुन देणारे परफॉर्मन्स दाखवण्यात आले. भव्यदिव्य निरोप सोहळा पार पडल्यानंतर आठवणी आपल्या सोबत ठेवून सर्व खेळाडूंनी ऑलिम्पिकला निरोप दिला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ‘बाय बाय रिओ’ म्हणत रिओ ऑलिम्पिक संपल्याची घोषणा केली.
 
206 देशांमधील तब्बल 11303 खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला . ज्यामध्ये निर्वासितांचादेखील समावेश होता. ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा अमेरिकेने आपलाच दबदबा असल्याचं सिद्ध केलं. सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक बनण्याचा बहुमान पैलवान साक्षी मलिकला मिळाला. 
अमेरिकेच्या खात्यात 46 सुवर्ण, 37 रौप्य आणि 38 कांस्य अशी एकूण 121 पदकं जमा झाली असून पदकतालिकेत पहिलं स्थान पटकावलं. त्यापाठोपाठ  ग्रेट ब्रिटन 27 सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर तर चीन 70 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आपलं नाव कोरलं. ग्रेट ब्रिटनच्या खात्यात 27 सुवर्ण, 23 रौप्य आणि 17 कांस्य अशी एकूण 67 पदकं जमा आहेत. तर चीननं 26 सुवर्ण, 18 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकूण 70 पदकांसह तिसरं स्थान मिळवलं. ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत घसरण झाल्याने चीनची निराशा झाली आहे.  
भारत मात्र अपेक्षित कामगिरी करु शकला नाही. ऑलिम्पिकमध्ये फक्त दोन पदकांसह भारताला परतावे लागले आहे. शुटिंगमध्ये भारताला पदक अपेक्षित होतं, मात्र साक्षी मलिक आणि पी व्ही सिंधू यांना वगळता भारतीय खेळाडूंकडून निराशा झाली. साक्षीनेच रिओमध्ये भारताचं पदकांचं खातं उघडलं होतं. ऑलिम्पिक पदक मिळवणारी साक्षी भारताची पहिलीच महिला पैलवान ठरली होती. त्यामुळेच ऑलिम्पिकच्या सांगता सोहळ्यात राष्ट्रध्वज घेऊन भारतीय पथकाचं नेतृत्त्व करण्याचा मान साक्षीला देण्यात आला. 
 

रिओ ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत भारत 67व्या स्थानावर असून भारताच्या खात्यात एक रौप्य आणि एक कांस्यपदक जमा आहे. मात्र यावेळी भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या कामगिरीमुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. 
 
रिओच्या महापौरांकडून ऑलिम्पिकचा ध्वज आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना देण्यात आला. बाक यांनी टोकियोच्या गर्व्हनर युरिको कोईकी यांच्याकडे ऑलिम्पिक ध्वज सुपूर्द केला.2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन जपानच्या टोकियोत करण्यात आलं आहे.
 
 

Web Title: The celebrated holiday celebrations of the Rio Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.