सेलेब्सचा हटके इन्स्टाग्राम डेब्यू!

By Admin | Published: June 9, 2017 02:29 AM2017-06-09T02:29:41+5:302017-06-09T02:29:41+5:30

सोशल मीडियाच्या जमान्यात आपल्या फेव्हरेट स्टार्सच्या घडामोडींची खबरबात ठेवणे सहज शक्य होते.

Celeste's Instagram debut! | सेलेब्सचा हटके इन्स्टाग्राम डेब्यू!

सेलेब्सचा हटके इन्स्टाग्राम डेब्यू!

googlenewsNext

- Satish Dongare
सोशल मीडियाच्या जमान्यात आपल्या फेव्हरेट स्टार्सच्या घडामोडींची खबरबात ठेवणे सहज शक्य होते. कारण हे सेलिब्रिटी आपल्या सोशल अकाऊंटवरून त्यांच्या आयुष्याशी निगडित बरीचशी माहिती शेअर करीत असतात. विशेषत: इन्स्टाग्रामवर सेलेब्सचा सर्वाधिक बोलबाला असल्याने त्यांची रिल व रिअल लाइफही सहज समजून येते. खरं तर आपल्या फेव्हरेट स्टार्सने इन्स्टावर यावे, अशी त्यांच्या चाहत्यांचीच इच्छा असते. त्यामुळेच बरेचसे स्टार्स चाहत्यांच्या इच्छेखातर इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले आहेत. चित्रपटाप्रमाणेच इन्स्टावरही दमदार डेब्यू करून त्यांनी चाहत्यांना सरप्राईज दिली आहे. अशाच काही सेलेब्सच्या इन्स्टा डेब्यूविषयीचा हा वृतांत...
अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्मा ही २०१३ मध्येच इन्स्टावर सक्रिय झाली आहे. इन्स्टा डेब्यू करताना अनुष्काने एक वेगळीच शक्कल लढविली होती. अनुष्काने पहिलाच असा काही फोटो शेअर केला होता, ज्यामुळे तिच्या चाहत्यांच्या मनात ‘पहचान कौन’ असा प्रश्न निर्माण झाला होता. फोटोमध्ये अनुष्काचा चेहरा नव्हे तर केवळ पाय दिसत होते. या पावलाच्या फोटोनेच अनुष्काने इन्स्टाग्रामवर पाऊल ठेवले होते.
अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चन याने फेब्रुवारी २०१२ मध्ये इन्स्टाग्रामवर डेब्यू केला होता. अभिषेकचा हा डेब्यू खूपच मजेशीर होता. कारण त्याने फोटोमध्ये स्वत:चा नव्हे तर कृष्णा अभिषेक याचा फोटो अपलोड केला होता. ज्यामुळे अभिषेकचे चाहते गोंधळात पडले होते. नंतर याविषयीचा उलगडा झाला.
अमिताभ बच्चन
महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या सर्वच फॉरमॅटमध्ये प्रचंड सक्रिय आहेत. इन्स्टावरदेखील ते नियमितपणे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. बिग बीने मार्च २०१३ मध्ये इन्स्टा अकाउंटला सुरुवात केली होती. सातपुड्याच्या टेकड्यांवर फिरतानाचा एक फोटो बिग बीने शेअर केला होता. फोटोमध्ये त्यांचे हावभाव एका लहान मुलांप्रमाणे होते.
दीपिका पदुकोण
बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही डंका वाजविणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सप्टेंबर २०१३ मध्ये इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली होती. त्यावेळी दीपिकाने एक कोलाज फोटो शेअर केला होता. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘लिमिटेड एडिशन.’
परिणिती चोप्रा
बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री परिणिती चोप्रा हिने २०१४ मध्ये आपल्या वाढदिवशी म्हणजे २२ आॅक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर सुरुवात केली होती. यावेळी तिने तिच्या मित्र आणि चाहत्यांबरोबर काढलेल्या बऱ्याचशा फोटोंचा एक कोलाज बनवून पोस्ट केला होता. परिणितीचा हा हटके डेब्यू सगळ्यांनाच आवडला होता.

Web Title: Celeste's Instagram debut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.