झिम्बाब्वे दौ-यासाठी चहल, फझल नवे चेहरे

By admin | Published: May 23, 2016 03:25 PM2016-05-23T15:25:20+5:302016-05-23T16:46:20+5:30

आगामी वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौ-यासाठी निवड समितीने आज भारतीय संघाची घोषणा केली.

Chahal, Fazal, new faces for Zimbabwe tour | झिम्बाब्वे दौ-यासाठी चहल, फझल नवे चेहरे

झिम्बाब्वे दौ-यासाठी चहल, फझल नवे चेहरे

Next
ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २३ - आगामी वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौ-यासाठी निवड समितीने आज भारतीय संघाची घोषणा केली. झिम्बाब्वे दौ-यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी निवड समितीने युवा संघाला संधी दिली आहे. 
 
भारतीय संघ यावर्षात आतापर्यंत टी-२० चे १६ सामने, पाच एकदिवसीय आणि आता आयपीएलचे सामने खेळत आहे. जूनपासूनही भारतीय संघाचे वेळापत्रक व्यस्त असणार आहे. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, आर.अश्विन, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांडया आणि उमेश यादव यांना ब्रेक दिला आहे. 
 
झिम्बाब्वे दौ-यात भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. त्यांच्या जागी हरयाणाचा लेगस्पिनर यजुवेंद्र चहल, ऑफस्पिनर जयंत यादव, विदर्भाचा फलंदाज फैज फझल, पंजाबचा मनदीप सिंग, कर्नाटकचा करुण नायर यांना संधी दिली आहे. 
 
केएल राहुल, अंबाती रायडू, रिषी धवन, अक्षर पटेल, केदार जाधव, जयदेव उनाडकट यांनाही संधी मिळाली आहे. पवन नेगी, युवराज सिंग, हरभजन सिंग यांना टी-२० मधून डच्चू मिळाला आहे. निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सोमवारी मुंबईत संघ निवड जाहीर केली. 
 
झिम्बाब्वेसाठीचा संघ - एम.एस.धोनी (कर्णधार), के.एल.राहुल, फैझ फैझल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायडू, रिषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मनदीप सिंह, केदार जाधव, जयदेव उनाडकट, यजुवेंद्र चहल, बरींदर सरन, 
 
वेस्ट इंडिज दौ-यासाठी 
कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धीमान सहा, रविंद्र जाडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दूल ठाकूर व स्टुअर्ट बिन्नी
 

 

Web Title: Chahal, Fazal, new faces for Zimbabwe tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.