चेन्नई सुपरकिंग्ज समोर २०३ धावांचे आव्हान
By Admin | Published: May 24, 2015 09:43 PM2015-05-24T21:43:46+5:302015-05-24T21:44:43+5:30
पार्थिव पटेल पहिल्याच षटकात धावचित झाल्याने मुंबई इंडियन्सच्या प्रेक्षकांची नाराजी झाली. मात्र लेंडल सिमॉन्स ने ४५ चेंडूत ८ चौकार व तीन षटकार लगावत ६८ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने २६
>ऑनलाइन लकोमत
कोलकाता, दि. २४ - २० षटकांत पाच गडी गमावत मुंबई इडियन्सने २०२ धावा केल्या आहेत.
पार्थिव पटेल पहिल्याच षटकात धावचित झाल्याने मुंबई इंडियन्सच्या प्रेक्षकांची नाराजी झाली. मात्र लेंडल सिमॉन्स ने ४५ चेंडूत ८ चौकार व तीन षटकार लगावत ६८ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने २६ चेंडूत ५० धावा केल्या . लेंडल सिमन्सने तडाखेबंद फलंदाजी करत ४५ चेंडूत आठ चौकार व तीन षटकार मारत ६८ धावा केल्या. तर रोहित शर्माने २६ चेंडूत सहा चौकार व दोन षटकार मारत ५० धावा झाल्या असताना रविंद्र जडेजाकडे झेल गेल्याने बाद झाला. तसेच कायरन पोलार्ड व अंबती रायडू या मधल्या फळीतील खेळाडूंनी प्रत्येकी ३६ धावा केल्याने संघाच्या धाव संख्येत तर भर पडलीच परंतू चेन्नईच्या गोलंदाजांच्या नाकी दम आणला. शेवटच्या फळीतील हार्दिक पांड्या भोपळा नफोडताच तंबूत परतला. तर शेवटी फलंदाजीकरता आलेल्या हरभजनने पहिल्याच चेंडूत षटाकर लगावली.