पंजाबसमोर हैदराबादचे 208 धावांचे आव्हान

By Admin | Published: April 28, 2017 09:49 PM2017-04-28T21:49:12+5:302017-04-28T21:53:33+5:30

शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या शानदार फलंदाचीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबला 208 धावांचे आव्हान दिले आहे.

Challenge against Hyderabad by 208 runs | पंजाबसमोर हैदराबादचे 208 धावांचे आव्हान

पंजाबसमोर हैदराबादचे 208 धावांचे आव्हान

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. 28 - शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या शानदार फलंदाचीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबला 208 धावांचे आव्हान दिले आहे. आयपीएलच्या या सामन्यात हैदराबाद सनरायजर्सने निर्धारित 20 षटकात 3 बाद 207 धावा केल्या आहेत.
या सामन्यात सनरायजर्स हैदराबादकडून फलंदाज शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यिमसन यांनी अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या भक्कम केली. शिखर धवनने 48 चेंडूत एक षटकार आणि नऊ चौकार लगावत 77 धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने 27 चेंडूत चार षटकार आणि 4 चौकारांची खेळी करत 51 धावा केल्या. केन विल्यिमसनने नाबाद 54 धावा केल्या. युवराज सिंग अवघ्या 12 धावा काढून तंबूत परतला. त्याला गोलंदाज मॅक्सवेलने झेलबाद केले. हेनरिक्सने नाबाद 7 धावा. तर, संघाला जादाच्या तीन धावा मिळाल्या. 
नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबकडून गोलंदाज ग्लेन मॅक्सवेलने दोन आणि मोहित शर्मान एक बळी टिपला. 

Web Title: Challenge against Hyderabad by 208 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.