झिम्बाब्वे दौऱ्यात फलंदाजीचा क्रम लावणे आव्हानात्मक - धोनी
By Admin | Published: June 7, 2016 06:31 PM2016-06-07T18:31:56+5:302016-06-07T18:31:56+5:30
झिम्बाब्वे संघात मोठे बदल झाले आहेत, घरच्या मैदानावर ते भारतीय संघासमोर चांगले आव्हान उभे करु शकतात. असे मत भारतीय संघाचा कर्णधार धोनीने व्यक्त केले.
ऑनलाइन लोमकत
नवी दिल्ली, दि. ७ : आगामी झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघात सर्व नवे चेहरे आहेत, त्यांच्यासोबत मी पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात खेळत आहे. झिम्बाब्वे संघात मोठे बदल झाले आहेत, घरच्या मैदानावर ते भारतीय संघासमोर चांगले आव्हान उभे करु शकतात, भारतीय संघात नवे उद्योनमुख खेळाडूंचा भरणा आहे, कोण कोणत्या क्रमावर चागंली फलंदाजी करतो हे समजण्याचा अवधी थोडा आहे, त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यात फलंदाजीचा क्रम लावणे आव्हानात्मक असेल. उद्या भारतीय संघात झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना होत आहे त्यापुर्वीच्या पत्रकार परिषेदेत महेंद्रसिंह धोनी बोलत होता. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या युवा खेळाडूंच्या संघाची धुरा महेंद्रसिंह धोनीकडे सोपविण्यात आली आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १६ सदस्यांचा भारतीय संघ निवडण्यात आला असून एकदिवसीय व टी-२० मालिकेसाठी एकच संघ ठेवण्यात आला आहे. फैझ फझल, यजुवेंद्र चहल आणि जयंत यादव हे मर्यादित षटकांच्या संघात नवीन चेहरे असून टी-२० विश्वचषक संघातील खेळाडू असतील. यंदाच्या मोसमात भारतीय संघाला एकूण १७ कसोटी सामने खेळायचे असून निवडकर्त्यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या आणि उमेश यादव यांना झिम्बाब्वे दौऱ्याकरिता विश्रांती दिली आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ :
(एकदिवसीय व टी-२०) : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), लोकेश राहुल, फैझ फजल, मनीष पांड्ये, करुण नायर, अंबाती रायुडू, रिषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, मनदीपसिंग, केदार जाधव, जयदेव उनाडकट आणि यजुवेंद्र चहल.
It will be a different experience, will be playing with many players for the first time:MS Dhoni on Zimbabwe tour pic.twitter.com/KA9t2dI638
— ANI (@ANI_news) June 7, 2016