बंगळुरू व चेन्नईत फायनलसाठी चुरस
By admin | Published: May 22, 2015 12:53 AM2015-05-22T00:53:48+5:302015-05-22T00:53:48+5:30
चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल-८ ची दुसरी क्वालिफायर शुक्रवारी येथील झारखंड क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममध्ये रात्री ८ वाजेपासून रंगणार आहे.
आज दुसरी क्वालिफायर : धोनी-विराटच्या नेतृत्वक्षमतेची कसोटी
रांची : चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल-८ ची दुसरी क्वालिफायर शुक्रवारी येथील झारखंड क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममध्ये रात्री ८ वाजेपासून रंगणार आहे. या लढतीत टीम इंडियाचे दोन दिग्गज वन डे कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कसोटी कर्णधार विराट कोहली यांच्या नेतृत्वक्षमतेचादेखील कस लागेल.
रविवारी मुंबईविरुद्ध कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात चेन्नई, तसेच बंगळुरूला अक्षरश: घाम गाळावा लागेल. मागच्या कामगिरीवरून तरी चेन्नईचे पारडे जड वाटते. यंदाच्या पर्वात उभय संघ दोनदा परस्परांविरुद्ध खेळले. दोन्ही वेळा चेन्नईनेच बाजी मारली. धोनीचा संघ २७ आणि २४ धावांनी सामने जिंकला होता. पण, त्यानंतरच्या सामन्यातील निकालावरून बंगळुरू भक्कम दावेदार वाटतो. दोन वेळेचा चॅम्पियन चेन्नईला मुंबईने पहिल्या क्वालिफायरमध्ये २५ धावांनी पराभूत केले होते. पण, विक्रमी सहाव्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी चेन्नईला चुकांपासून बोध घ्यावाच लागेल. आयपीएल इतिहासात चेन्नई सर्वांत यशस्वी संघ आहे. २०१० आणि २०११ साली या संघाने जेतेपद पटकविले, तर एकूण पाच वेळा अंतिम फेरीतही धडक दिली.
बंगळुरूवर विजय मिळवायचा झाल्यास चेन्नईला बराच आटापीटा करावा लागेल. सर्वाधिक धावा काढणारा बे्रंडन मॅक्युलम मायदेशी परत गेल्याने चेन्नईची फलंदाजी कमकुवत झाली. संघाची चांगली सुरुवात मॅक्युलमवर बऱ्याच अंशी विसंबून होती. मुंबईविरुद्ध पहिल्या क्वालिफायरमध्ये १८७ धावांचा पाठलाग करणारा चेन्नई संघ २५ धावांनी हरला.
फाफ डुप्लासिस, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो यांनी चांगली सुरुवात केली खरी, पण मोठी खेळी करण्यात सर्वच अपयशी ठरले होते. गोलंदाजही मुंबईच्या फलंदाजांवर दडपण आणू शकले नाहीत. पवन नेगी, रवींद्र जडेजा, मोहित शर्मा आणि ब्राव्हो यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकले नाही. (वृत्तसंस्था)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, दिनेश कार्तिक, मिशेल स्टार्क, निक मेडिनसन, वरुण अॅरोन, यजुवेंद्र चहल, विजय झोल, अबू नेचिम अहमद, हर्षल पटेल, अशोक डिंडा, मानविंदर बिस्ला, सीन एबोट,
जलज सक्सेना, सर्फराज खान, शिशिर बावणे, एस. अरविंद.
चेन्नई सुपर किंग्स :
एम. एस. धोनी (कर्णधार), आशिष नेहरा, बाबा अपराजित, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ, फाफ डुप्लेसिस, ईश्वर पांडे, मॅट हेन्री, मिथुन मन्हास, मोहित शर्मा, पवन नेगी, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, सॅम्युअल बद्री, सुरेश रैना, रोनित मोरे, मायकेल हसी, राहुल शर्मा, काइल एबोट, अंकुश बैस, इरफान पठाण, प्रत्युष सिंग, अॅन्ड्र्यू टाये आणि एकलव्य द्विवेदी.
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉॅयल चॅलेजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ एकमेकांसमोर १९ वेळा ठाकले आहेत. यामध्ये चेन्नईने ११, तर बंगळुरूने ७ वेळा विजय नोंदविला आहे. एका लढतीचा निकाल लागू शकला नाही.
आयपीएल ८ मध्ये दोन्ही संघ ... चेन्नई सुपर किंग्ज संघाने या आयपीएल सत्रात रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघाला बंगळुरू येथे २२ एप्रिल रोजी २७ धावांनी, तर चेन्नई येथे ४ मे रोजी २४ धावांनी पराभूत केले होते.
एलिमिनेटरमध्ये राजस्थानला ७१ धावांनी सहज नमविणाऱ्या बंगळुरू संघात उत्साह संचारला.
ख्रिस गेल, कोहली, एबी डिव्हिलियर्स, मनदीपसिंग आणि दीनेश कार्तिक हे सर्व
जण धावा काढण्यात तरबेज आहेत. डिव्हिलियर्स (५१२) ,गेल (४५०) हे आयपीएलमध्ये शतकवीर आहेत.
बुधवारी गेल आणि कोहली अपयशी ठरल्यानंतरही संघाने १८० पर्यंत मजल गाठली, यावरून त्यांची फलंदाजी भक्कम असल्याचे निष्पन्न झाले.
शिवाय गोलंदाजीत
अरविंद श्रीनाथ, हर्षल पटेल, डेव्हिड वीज यांच्याकडून बराच पाठिंबा लाभला. यजुवेंद्र चहल संघात एकमेव यष्टिरक्षक असून, आतापर्यंत त्याने २१ गडी बाद केले.