डोपिंगचे नियम लागू करणे ‘नाडा’पुढे आव्हान, डोप चाचणीसाठी प्रत्येक खेळाडूवर ५०० डॉलरचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 04:33 AM2019-08-12T04:33:33+5:302019-08-12T04:33:52+5:30

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अखेर राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीच्या (नाडा) नियंत्रणाखाली येण्याचे मान्य केले, पण याच्या पूर्ण प्रभावाखाली येण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत.

The challenge to Nada to implement rules of doping | डोपिंगचे नियम लागू करणे ‘नाडा’पुढे आव्हान, डोप चाचणीसाठी प्रत्येक खेळाडूवर ५०० डॉलरचा खर्च

डोपिंगचे नियम लागू करणे ‘नाडा’पुढे आव्हान, डोप चाचणीसाठी प्रत्येक खेळाडूवर ५०० डॉलरचा खर्च

googlenewsNext

लखनौ : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अखेर राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीच्या (नाडा) नियंत्रणाखाली येण्याचे मान्य केले, पण याच्या पूर्ण प्रभावाखाली येण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत.
जाणकारांच्या मते भारतात क्रिकेटला धर्म आणि खेळाडूंना देव मानले जाते. अशा स्थितीत नाडाला क्रिकेटपटूंवर आपले सर्व नियम लागू करता येईल का, असा प्रश्न उपस्थित होतो.
राष्ट्रीय ज्युनिअर हॉकी संघाचे माजी फिजिकल ट्रेनर व स्पोर्ट््स मेडिसिन स्पेशलिस्ट डॉक्टर सरनजित सिंग यांनी आपल्या खेळाडूंची डोप चाचणी नाडातर्फे करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर साशंकता व्यक्त केली. ते म्हणाले, भारतात क्रिकेटची पूजा केली जाते आणि खेळाडूंना देव मानले जाते. तर हे देव ते सर्व नियम मानण्यास तयार होतील का ? ते विश्व डोपिंगविरोधी एजन्सीतर्फे (वाडा) २००४ मध्ये तयार करण्यात आलेल्या ‘थांबण्याच्या स्थानाबाबतचा’ नियम पूर्णपणे मानतील का ? त्यानुसार त्यांना प्रत्येक तासात स्वत:बाबतची सूचना नाडाला द्यावी लागेल ?
ते पुढे म्हणाले, ‘जर क्रिकेटपटू या सर्व बाबीसाठी तयार असतील आणि नाडा प्रामाणिकपणे काम करत असेल तर माझ्या मते पृथ्वी शॉ चे प्रकरण केवळ योगायोग नाही.’
पंजाब रणजी संघाचे शारीरिक प्रशिक्षकपद सांभाळणारे सिंग म्हणाले की, बीसीसीआयला नाडाकडून डोप चाचणी करून घेण्यास मंजुरी प्रदान करण्यास एवढा वेळ का लागला. हा मोठा प्रश्न आहे. दुसरी बाब ही आहे की, नाडा बीसीसीआयसारख्या बलाढ्य संघटनेबाबत सर्व नियम पूर्णपणे लागू करेल का ? अनेक अशा बलाढ्य क्रीडा संस्था आहेत की, ज्या वाडाचे सर्व नियम पूर्णपणे मानत नाहीत. त्यामुळे त्यांचे खेळाडू सहजपणे डोप चाचणीतून बचावतात. प्रत्येक प्रकारचे ड्रग सेवन प्रकरण चव्हाट्यावर आणण्यास नाडा सक्षम आहे का, याबाबत बोलताना सिंग म्हणाले, ‘असे नाही कारण डोपिंगचे अनेक प्रकरणे वेळेवर चव्हाट्यावर आणण्यात नाडा व वाडा यांना अपयश आले आहे. त्यामुळेच वर्ष २०१२ च्या आॅलिम्पिक स्पर्धेत बंदी असलेल्या औषधांचे सेवन करणारे खेळाडू आता पकडले जात आहेत. १९६० च्या दशकात ज्यावेळी डोपिंगवर बंदी घालण्यात आली होती त्यावेळी केवळ पाच-सहा पदार्थ होते. यंदा जानेवारीमध्ये वाडाने बंदी असलेल्या पदार्थाची यादी जाहीर केली त्यात ३५० कंपाऊंडचा समावेश आहे. या सर्व पदार्थांची चाचणी करण्यासाठी प्रति खेळाडू ५०० डॉलरचा खर्च येतो. त्यामुळे नाडा प्रत्येक खेळाडूच्या चाचणीसाठी ५०० डॉलर खर्च करणार का ?
भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये सल्लागारपद भूषविणारे सिंग म्हणाले की, बंदी असलेले पदार्थ पकडण्याचे तंत्रही पूर्णपणे ‘नाडा’कडे नाही. हे नवे तंत्र असून त्याची किंमत अब्जावधी रुपये आहे. हे तंत्रज्ञान नाडाकडे उपलब्ध नाही. डोपिंगमध्ये दोषी असलेल्या खेळाडूंच्या तुलनेत ड्रग्स घेतल्यानंतरही यातून बचावलेल्या खेळाडूंची टक्केवारी अधिक आहे.’

स्टार खेळाडूंच्या चाचणीचे आव्हान

स्पोर्ट््स मेडिसिन स्पेशालिस्ट पीएसएम चंदन यांच्या मते नाडाला क्रिकेट खेळाडूंच्या डोपिंग चाचणीसाठी उच्च पातळीवरील व्यावसायिक दृष्टिकोन बाळगावा लागणार आहे. ते म्हणाले, विराट कोहली, जसप्रीत बुमराह व शिखर धवनसारख्या प्रसिद्ध खेळाडूंचे नमुने घेताना एजन्सीला मोठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे.’

Web Title: The challenge to Nada to implement rules of doping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत