भारतासमोर इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान
By admin | Published: July 22, 2014 12:03 AM2014-07-22T00:03:01+5:302014-07-22T00:03:01+5:30
दिल्लीत 2क्1क्ला झालेल्या 19 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना तब्बल 1क्1 पदकांची कमाई करून नवा इतिहास रचला होता.
Next
ग्लास्गो : दिल्लीत 2क्1क्ला झालेल्या 19 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना तब्बल 1क्1 पदकांची कमाई करून नवा इतिहास रचला होता.मात्र, आता ग्लास्गोत 23 जुलैपासून प्रारंभ होणा:या राष्ट्रकुल स्पर्धेत या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान भारतासमोर असणार आह़े
गत राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करताना 38 सुवर्णपदके, 27 रौप्य आणि 36 कांस्यपदकांसह एकूण 1क्1 पदकांची कमाई केली होती़ या कामगिरीच्या बळावर भारताने पदक तालिकेत ऑस्ट्रेलियानंतर (एकूण 177 पदके) दुसरा क्रमांक मिळविला होता़ भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील ही सवरेत्कृष्ट कामगिरी होती़
आता ग्लास्गोत पुन्हा भारतीय खेळाडूंचा कस लागणार आह़े भारताने गत राष्ट्रकुलनंतर चीनमधील ग्वांग्झू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत दुसरे सवरेत्कृष्ट प्रदर्शन केले होत़े दोन वर्षानंतर भारतीय खेळाडूंनी लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके आपल्या नावे करून आपले बेस्ट प्रदर्शन केले होत़े मात्र, आता ग्लास्गोत होणा:या राष्ट्रकुलमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आह़े कारण भारतीय खेळाडूंच्या तयारीबद्दल भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए), भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि संबंधित खेळांच्या महासंघांनी अधिकृत माहिती दिली नाही़ भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत 224 सदस्यीय पथक उतरवले आह़े विशेष म्हणजे दिल्लीत 21 खेळांचे आयोजन झाले होते; मात्र आता ग्लास्गोत 17 खेळांचेच आयोजन होणार आह़े 17 पैकी भारत केवळ 14 क्रीडा प्रकारांतच आपले नशीब अजमावणार आह़े याच
कारणामुळे भारताच्या पदकांची संख्या घटेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आह़े (वृत्तसंस्था)
राष्ट्रकुलमधून
तीन खेळ आउट
ग्लास्गोत होणा:या राष्ट्रकुल स्पर्धेतून टेनिस, धनुर्विद्या आणि ग्रीको रोमन कुस्ती या खेळांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आह़े नेमबाजी स्पर्धाची संख्या 36 वरून 19 करण्यात आली आह़े याचाच परिणाम भारताच्या पदकांवर होईल़ कारण बाहेर करण्यात आलेल्या खेळांमध्येच भारताने गत राष्ट्रकुलमध्ये प्रभावी कामगिरी केली.
आयओएकडून निरोप समारंभाला दांडी
ऑलिम्पिक, राष्ट्रकुल किंवा आशियाई या सर्व प्रतिष्ठित स्पर्धेला भारतीय खेळाडू रवाना होण्यापूर्वी परंपरेनुसार निरोप दिला जातो; मात्र ग्लास्गोसाठी रवाना झालेल्या भारतीय खेळाडूंसाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) अधिकृतपणो निरोप समारंभाचे आयोजनच केले नाही़ ग्लास्गोत 22 जुलैपासून राष्ट्रकुल स्पर्धेस प्रारंभ होत आह़े खेळाडूंसाठी एक-दोन निरोप समारंभाचे आयोजन झाले होत़े मात्र, तेसुद्धा खासगी प्रायोजकांनी आयोजित केले होत़े आयओएला खेळाडूंना निरोप देण्याचे शहाणपण सुचलेच नाही़ आयओएचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी हे मोठय़ा खेळाच्या आयोजनापूर्वी भारतीय खेळाडूंसाठी अधिकृतपणो विदाई समारंभाचे आयोजन करण्यात येत असे आणि त्यात खेळाडू मोठय़ा संख्येने उपस्थित राहत होत़े या प्रसंगी माध्यमांनाही खेळाडूंची तयारी कशी झाली, या संदर्भात माहिती देण्यात येत होती. दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे 224 सदस्यीय पथक 14 खेळांमध्ये नशीब अजमावणार आह़े