स्टेनचा मारा खेळणे वेगळे आव्हान

By admin | Published: November 1, 2015 02:50 AM2015-11-01T02:50:01+5:302015-11-01T02:50:01+5:30

कसोटी क्रिकेटमध्ये डेल स्टेनचा मारा खेळणे वेगळे आव्हान असल्याचे मत भारतीय सलामीवीर लोकेश राहुल याने व्यक्त केले आहे.

Challenge separate from Stain's hit | स्टेनचा मारा खेळणे वेगळे आव्हान

स्टेनचा मारा खेळणे वेगळे आव्हान

Next

नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटमध्ये डेल स्टेनचा मारा खेळणे वेगळे आव्हान असल्याचे मत भारतीय सलामीवीर लोकेश राहुल याने व्यक्त केले आहे.
द. आफ्रिकेविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज असलेला राहुल आयपीएलमध्ये सनराइजर्स संघाकडून स्टेनसोबत खेळला आहे. पण बोर्ड एकादशकडून द. आफ्रिकेविरुद्ध ७२ धावांची खेळी हा वेगळाच अनुभव असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘स्टेनचा मारा सहज खेळता येईल, असे वाटले होते; पण आज बोर्ड एकादशसाठी
त्याच्या गोलंदाजीचा सामना करताना वेगळा अनुभव आला. त्याच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण किंवा यष्टिरक्षण करणे ही वेगळी बाब आणि मारा खेळून काढणे, ही वेगळी बाब आहे. स्टेन चेंडू आपल्या मनगटाने हवा तसा वळवितो. त्याचे चेंडू खेळणे आव्हानात्मक आहे. स्टेनविरुद्ध खेळण्याचे आव्हान पेलायची मला उत्सुकता आहे.’
पाच कसोटी सामन्यांत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २३ वर्षांच्या राहुलने स्टेनच्या मनात काय आहे, हे समजणे कठीण असल्याची कबुली दिली. मी तो प्रयत्न करणार असल्याचे सांगून वेगवान गोलंदाजाच्या मनातले हेरणे किती कठीण असते आणि वेगवान गोलंदाज प्रत्येक सामन्यात वेगळा विचार करतात. त्यांचे चेंडू किती शिताफीने खेळायचे याचे डावपेच आपल्याकडे असायला हवेत, असे लोकेश म्हणाला.
कर्नाटकच्या या सलामीवीराने कसोटीची तयारी करण्याचे श्रेय कर्नाटकचे कोच अरुण कुमार यांना दिले. तो म्हणाला, ‘मी द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी डोळ्यापुढे ठेवून वळण घेणाऱ्या चेंडूंवर टोलेबाजी करण्याचा सराव केला. मी अरुण कुमार यांच्याकडून धडे घेत असून आखूड टप्प्याचे पण वेगवान चेंडू खेळण्यावर भर देत आहे. आतापर्यंतचा प्रवास चांगलाच राहिला.’
सलामीवीरासाठी राहुलची स्पर्धा शिखर धवन आणि मुरली विजय यांच्यासोबत आहे. पण राहुलच्या मते भारतीय तंबूत कुठलीही स्पर्धा नाही. तो म्हणतो,‘ज्या दिवशी मी ड्रेसिंगरुममध्ये प्रवेश केला तेव्हापासून मला कुठलीही स्पर्धा जाणवली नाही. शिखर आणि विजय यांनी मला कसोटी सामना रणजीच्या तुलनेत किती वेगळा आहे, याबद्दल समजावून सांगितले. दोघांच्याही टीप्समुळे माझे काम सोपे झाले आहे.
आम्ही सर्वजण युवा असल्याने मैत्रीपूर्ण वातावरण आहे. आम्ही सर्वजण एकमेकांना प्रोत्साहन देतो. एकमेकांच्या कामगिरीचा आनंदही लुटतो. याचा सकारात्मक परिणाम संघाच्या कामगिरीवर पडतो.’
(वृत्तसंस्था)

Web Title: Challenge separate from Stain's hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.