गुजरातसमोर बंगळुरुचे 135 धावांचे आव्हान
By Admin | Published: April 27, 2017 09:47 PM2017-04-27T21:47:13+5:302017-04-27T21:53:21+5:30
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेगुजरात लायन्सला 135 धावांचे आव्हान दिले आहे. आयपीएलच्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात सर्व गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा केल्या.
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 27 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेगुजरात लायन्सला 135 धावांचे आव्हान दिले आहे. आयपीएलच्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात सर्व गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा केल्या.
गुजरात लायन्सने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. गुजरात लायन्सच्या गोलंदाजीपुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची दाणादाण उडाली. त्याची सुरुवातच खराब झाली. फलंदाज केदार जाधव (31) आणि पवन नेगी (32) वगळता कोणीही चांगली खेळी केली नाही. सलामीचा आणि संघाचा तडफदार फलंदाज ख्रिस गेल अवघ्या आठ धावांवर बाद झाला. तर, कर्णधार विराट कोहली 10 धावांवर तंबूत परतला. त्याला गोलंदाज बासिल थम्पीने फेंच करवी झेलबाद केले. एबी डिलिव्हर्स 5 धावांवर धावबाद झाला. ट्रेव्हिस हेड एकही धाव काढता आली नाही. मनदीप सिंग (8), सॅम्युल बद्री (3), श्रीनाथ अरविंद (9), अनिकेत चौधरी नाबाद 15 धावा केल्या आणि युझवेंद्र चाहल शेवट्या चेंडूत एक धाव काढून धावबाद झाला. याचबरोबर, संघाला 12 जादाच्या धावा मिळाला.
गुजरात लायन्सकडून गोलंदाज अॅन्ड्रू टायने सर्वाधिक जास्त तीन बळी घेतले. तर, रविंद्र जाडेजाने दोन आणि जेम्स फॉक्नर, अंकित सोनी आणि बासिल थंम्पी यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.