भारताला नमवणे आव्हानात्मक

By Admin | Published: September 14, 2016 05:18 AM2016-09-14T05:18:10+5:302016-09-14T05:18:10+5:30

भारतीय संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर आणि त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या वातावरणात नमवणे मोठे आव्हान असेल, असे वक्तव्य १४ ग्रँडस्लॅम पटकावलेला स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने केले

Challenging India is challenging | भारताला नमवणे आव्हानात्मक

भारताला नमवणे आव्हानात्मक

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर आणि त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या वातावरणात नमवणे मोठे आव्हान असेल, असे वक्तव्य १४ ग्रँडस्लॅम पटकावलेला स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने केले. वर्ल्ड ग्रुप डेव्हिस कप प्लेआॅफ सामन्याआधी नदालने आपले मत मांडले.
भारताविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यासाठी स्पेनने आपला तगडा संघ पाठवला आहे. यामध्ये ‘राफा’सह अनुभवी डेव्हिड फेररचाही समावेश आहे. स्पेनचा २० सदस्यीय संघ सोमवारी भारतात पोहोचल्यानंतर राफाने संध्याकाळी कोर्टवर कसून सराव करीत वातावरणाचा अंदाज घेतला. तसेच, फेररनेदेखील सुमारे दीड तास सराव केला.
‘राफा’ने सांगितले, ‘‘येथील कोर्ट खूप चांगले आहे, परंतु वातावरण गरम आहे. मात्र, पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर आल्याने चांगले वाटत आहे.’’ या लढतीत एकीकडे बलाढ्य स्पेनला संभाव्य विजेते मानले जात असताना, दुसरीकडे यजमान भारताकडे तळाच्या स्थानावरील साकेत मिनेनी (१३७ रँकिंग) आणि रामकुमार रामनाथन (२०३) यांचा समावेश आहे. आपल्याहून अत्यंत कमी मानांकन असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंविषयी राफा म्हणाला, ‘‘आमच्यासाठी हा सामना महत्त्वपूर्ण असून आम्हाला वर्ल्ड ग्रुप प्लेआॅफ सामना जिंकणे अनिवार्य आहे.’’
त्याचप्रमाणे, ‘‘मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करीत असून माझ्यासाठी हीच बाब सर्वात महत्त्वाची आहे. जेव्हा आपण देशाबाहेर खेळत असतो तेव्हा प्रत्येकासाठी परिस्थिती वेगळी असते. भारतीय संघ खूप चांगला असून आम्ही त्यांच्याकडून कडव्या आव्हानाची अपेक्षा करीत आहोत. शिवाय घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांना येथील परिस्थितीचा फायदा मिळेल,’’ असेही राफा याने या वेळी सांगितले.

एकूणच हा पूर्णपणे एकतर्फी सामना असल्याचे जाणकारांचे मत असल्याने, अशा परिस्थितीत स्पेनकडे गमावण्यासारखे खूप काही आहे.२०१४ मध्ये जर्मनीविरुद्ध १-४ असे पराभूत झाल्यानंतर पहिल्याच फेरीतून स्पेन संघ बाद झाला होता.
या धक्क्यातूनच धडा घेताना त्यांनी या वेळी आपला मजबूत संघ उतरवला आहे.

Web Title: Challenging India is challenging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.