चामीराचे पाच बळी, न्यूझीलंड बॅकफूटवर
By Admin | Published: December 20, 2015 02:52 AM2015-12-20T02:52:07+5:302015-12-20T02:52:07+5:30
युवा वेगवान गोलंदाज दुष्यंत चामीराच्या भेदक माऱ्याच्या बळावर दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले.
हॅमिल्टन : युवा वेगवान गोलंदाज दुष्यंत चामीराच्या भेदक माऱ्याच्या बळावर दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले.
चामीराने करियरमध्ये पहिल्यांदा ४७ धावांत पाच गडी बाद केले. त्यामुळे लंकेच्या पहिल्या डावातील २९२ धावांना उत्तर देणाऱ्या न्यूझीलंडची स्थिती बिनबाद ८१ वरून दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा ९ बाद २३२ अशी झाली. ड्रग ब्रेसवेल ३० धावांवर नाबाद आहे. नील वेगलर १७ धावा काढून अखेरच्या चेंडूवर बाद झाला. २० वर्षांच्या चामीराने पहिल्या स्पेलमध्ये १७ धावांत तीन आणि दुसऱ्या स्पेलमध्ये ३० धावांत दोन गडी बाद केले. ६७ वा सामना खेळणाऱ्या रंगना हेरथने ७५ धावांत दोन गडी बाद केले. मार्टिन गुप्तिल आणि टॉम लेंथम यांनी सलामीला ८१ धावा केल्या. यानंतर चामीरा आणि हेरथ यांनी चार षटकांत आठ धावांत चार गडी बाद केले. मार्टिनने गुप्तिलने अर्धशतक ठोकले. मिशेल सेंटनर ३८ आणि वाटलिंग २८ यांनी चांगली भागीदारी केली; पण मोठी खेळी करू शकले नाहीत.
त्याआधी लंकेने कालच्या धावसंख्येत २८ धावांची भर घातली, तोच त्यांचा पहिला डाव आटोपला. कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने
सर्वाधिक ७७ धावांचे योगदान दिले. टीम साऊदी याने लॅथमकरवी मॅथ्यूजला तिसऱ्या स्लिपमध्ये
झेलबाद केले. (वृत्तसंस्था)
धावफलक :
श्रीलंका पहिला डाव ८०.१ षटकांत सर्वबाद २९२, कुसल मेंडिस झे.वॅटलिंग गो.साउथी ३१, उदारा जयसुंदेरा धाव बाद सेन्टनर/वॅटलिंग २६, दिनेश चंडिमल झे.वॅटलिंग गो.ब्रेसवेल ४७, अँजेलो मॅथ्युज् झे. लॅथम गो.साउथी ७७, मिलिंदा श्रीवर्धना झे. टेलर गो. बोल्ट ६२, नुवान प्रदीप नाबाद २, ट्रेंट बोल्ट २/५१, टीम साउथी ३/६३, डग्लस ब्रेसवेल २/८१.
न्युझिलंड - पहिला डाव ७८.४ षटकांत ९ बाद २३२, मार्टिन गुप्तील झे. मॅथ्युज् गो. हेराथ ५०, टॉम लॅथम झे.करुणारत्ने गो. चमिरा २८, मिशेल सॅन्टनर झे. चंडिमल गो. प्रदीप ३८, ब्रॅडली जॉन वॅटलिंग झे. विथांगे गो. लकमल २८, डग्लस ब्रेसवेल नाबाद ३०, नील वॅग्नर झे. विथांगे गो. चमिरा १७, रंगना हेराथ २/७५, दुशमंथा चमिरा ५/४७.