चिराग क्रिकेटर्सला विजेतेपद

By Admin | Published: January 30, 2016 12:17 AM2016-01-30T00:17:36+5:302016-01-30T00:17:36+5:30

तिसवाडी : चोडण पंचायत र्मयादित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत माडेल येथील चिराग क्रिकेटर्सने गोपाळकृष्ण क्रिकेटर्स, खेराडचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. चोडण येथील चाफेर्श्वर क्रिकेटर्सने आयोजित केलेली स्पर्धा साऊद-चोडण मैदानावर खेळविण्यात आली होती. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिराग क्रिकेटर्सने 5 षटकांत 3 बाद 57 धावा केल्या. गोपाळकृष्ण क्रिकेटर्सने 8 बाद 34 धावा केल्या. युनिफायड क्रिकेटर्स हा तिसर्‍या क्रमांकावर राहिला. विजेत्यास संघास 7 हजार रोख व चषक, उपविजेत्यास 5 हजार व चषक प्रदान करण्यात आला. या स्पर्धेत एकूण 16 संघानी भाग घेतला होता.

Champion cricketers win championship | चिराग क्रिकेटर्सला विजेतेपद

चिराग क्रिकेटर्सला विजेतेपद

googlenewsNext
सवाडी : चोडण पंचायत र्मयादित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत माडेल येथील चिराग क्रिकेटर्सने गोपाळकृष्ण क्रिकेटर्स, खेराडचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. चोडण येथील चाफेर्श्वर क्रिकेटर्सने आयोजित केलेली स्पर्धा साऊद-चोडण मैदानावर खेळविण्यात आली होती. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिराग क्रिकेटर्सने 5 षटकांत 3 बाद 57 धावा केल्या. गोपाळकृष्ण क्रिकेटर्सने 8 बाद 34 धावा केल्या. युनिफायड क्रिकेटर्स हा तिसर्‍या क्रमांकावर राहिला. विजेत्यास संघास 7 हजार रोख व चषक, उपविजेत्यास 5 हजार व चषक प्रदान करण्यात आला. या स्पर्धेत एकूण 16 संघानी भाग घेतला होता.
सामनावीर म्हणून- अनुप खांडेपारकर (चिराग क्रिकेटर्स), मालिकावीर- गोपाल (गोपाळकृष्ण क्रिकेटर्स), उत्कृष्ट फंलदाज- विराज कुंडईकर (चिराग), उत्कृष्ट गोलंदाज- गोपाल (गोपाळकृष्ण), चांगला भवितव्य असेलेला खेळाडू- गौरव म्हादरेळकर यांना वैयक्तिक रोख बक्षिसे देण्यात आली.
दरम्यान, बक्षीस वितरणास उद्योजक व समाजसेवक प्रवीण झांटये. खास आमंत्रित म्हणून- चोडण सरपंच आरती बांदोडकर, पंच दिव्या उसपकर, माजी पंच मिलिंद महाले उपस्थित होते. गोपाळ मयेकर यांनी प्रथम सर्वांचे स्वागत केले. तर मनोज महाले यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

चोडण येथील क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना प्रमुख पाहुणे उद्योजक प्रवीण झांट्ये, सरपंच आरती बांदोडकर, पंच दिव्या उसपकर व मिलिंद महाले.
(छाया- र्शीकृष्ण हळदणकर)

Web Title: Champion cricketers win championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.