Champions Trophy : या पाच कारणांसाठी बांगलादेशचा संघ भारतासाठी धोकादायक

By admin | Published: June 15, 2017 11:04 AM2017-06-15T11:04:46+5:302017-06-15T11:04:46+5:30

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. बांगलादेशच्या तुलनेत भारताचा संघ सर्वच आघाडयांवर सरस असला तरी...

Champions Trophy: Bangladesh will be dangerous for these five reasons | Champions Trophy : या पाच कारणांसाठी बांगलादेशचा संघ भारतासाठी धोकादायक

Champions Trophy : या पाच कारणांसाठी बांगलादेशचा संघ भारतासाठी धोकादायक

Next

 ऑनलाइन लोकमत 

बर्मिंगहॅम, दि. 15 - यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. बांगलादेशच्या तुलनेत भारताचा संघ सर्वच आघाडयांवर सरस असला तरी, आपल्याला काही गोष्टींसाठी बांगलादेशपासून संभाळून राहण्याची गरज आहे. 
 
1) श्रीलंकेचा भारतावर विजय, बांगलादेशची न्यूझीलंडवर मात तसेच पाकिस्तानचा इंग्लंडवर विजय या निकालांनी क्रिकेट पंडितांचे अंदाज चुकवले. त्यामुळे आज बांगलादेश विरुद्ध होणा-या सामन्यात भारताचे पारडे जड असेल तरी भारतच जिंकेल असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. 
 
2)  2007 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशने भारताला पराभूत करुन संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का दिला. त्यामुळे वर्ल्डकपमधील भारताची वाटचाल साखळीतच संपली. 2015 च्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्धच्या उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यातही रोहित शर्माला बाद न देण्याचा निर्णयही बराच वादग्रस्त ठरला होता. त्यावेळी रोहित बाद झाला असता तर, भारताचा डाव अडचणीत सापडला असता. 2015 मध्ये भारत-बांगलादेशमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशने 2-1 ने विजय मिळवला होता. 2016 च्या टी-20 वर्ल्डकपमध्येही भारताने बांगलादेशवर अवघ्या 1 रन्सने विजय मिळवला होता. 
 
आणखी वाचा 
 
3)  चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोन्ही सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली असली तरी, त्यांना पहिल्या पावरप्लेचा फायदा उचलता आलेला नाही. पहिल्या दहा षटकात भारताने पाकिस्तान विरुद्ध 46, श्रीलंके विरुद्ध 48 आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध 35 धावा केल्या. 
 
4) कॅचेस विन मॅचेस म्हटले जाते. उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात झेल सोडणे भारताला परवडणारे नाही. पाकिस्तान विरुद्ध केदार जाधवने, हार्दिक पांडयाने कुशल मेंडिस, हाशिम आमला यांचे झेल सोडले होते. भारताला क्षेत्ररक्षणातही आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. 
 
5) आर. अश्विनचा संघात समावेश झाला असला तरी, एक वेगवान गोलंदाज कमी झाला आहे. अश्विनच्या समावेशाने फलंदाजीत फायदा होणार असला तरी, हाणामारीच्या षटकात फटका बसू शकतो. कमी धावसंख्येचा आपण बचाव करु शकतो ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतावर अजून अशी वेळ आलेली नाही.  
 

Web Title: Champions Trophy: Bangladesh will be dangerous for these five reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.