चॅम्पिअन्स ट्रॉफी - भारत अडचणीत, सेमीफायनलसाठी करा किंवा मरा

By admin | Published: June 9, 2017 09:04 AM2017-06-09T09:04:47+5:302017-06-09T09:08:13+5:30

श्रीलंकेने सात गडी राखून मिळवलेल्या दमदार विजयानंतर भारताचं गणित बिघडलं असून आता करा किंवा मरा अशी परिस्थिती झाली आहे

Champions Trophy - For India, Turns out for semi-final or die | चॅम्पिअन्स ट्रॉफी - भारत अडचणीत, सेमीफायनलसाठी करा किंवा मरा

चॅम्पिअन्स ट्रॉफी - भारत अडचणीत, सेमीफायनलसाठी करा किंवा मरा

Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 9 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी दावेदार समजल्या जाणा-या भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. श्रीलंकेने सात गडी राखून मिळवलेल्या दमदार विजयानंतर भारताचं गणित बिघडलं असून आता करा किंवा मरा अशी परिस्थिती झाली आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी भारत सहजपणे फायनल गाठेल असा दावा केला जात होता, मात्र श्रीलंकेने 321 धावांचा पाठलाग करताना भारतावर सात गडी राखत सहज विजय मिळवला. श्रीलंकेचा पराभव केला असता तर भारत सहजपण सेमीफायनलमध्ये पोहोचला असता. पण सेमीफायनलमध्ये पोहोचणं भारतासाठी आता तितकं सोपं नसणार आहे.
 
(फलंदाजांची चमक, लंकेची सरशी)
(भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी : ब्रेट ली)
(पाकिस्तान विजयी)
 
ग्रुप बी मध्ये आता फक्त दोनच सामने बाकी आहे. रविवारी भारतीय संघ आयसीसी वनडे रँकिंगमधअये पहिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या दक्षिण अफ्रिकेसोबत दोन हात करणार आहे. तर सोमवारी पाकिस्तान आणि श्रीलंका आपापसात भिडणार आहेत. सेमीफायनलमध्ये कोणते दोन संघ पोहोचतील हे या दोन्ही सामन्यांचा निकालच ठरवणार आहे. 
 
दक्षिण अफ्रिकेविरोधात करा किंवा मरा
भारताचा पुढील सामना रविवारी दक्षिण अफ्रिकेसोबत होणार आहे. या सामन्याला हवं तर क्वार्टर फायनलही म्हणू शकतो. हा सामना जिंकणा-या संघाचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास नक्की होईल. जर भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला तर भारताचं सेमीफायनलचं तिकीट नक्की होईल. पण जर भारताचा पराभव झाला तर आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2017 मधील त्यांचा प्रवास तिथेच संपेल. 
 
पाकिस्तान आणि श्रीलंकेची क्वॉर्टर फायनल
सोमवारी ग्रुप बी मधील पाकिस्तान आणि श्रीलंका आपापसात भिडतील. भारतासमोर शरणागती पत्करलेल्या पाकिस्तान संघाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. सोमवारी हा सामना जिंकणारा संघही सेमीफायनलमध्ये आपलं स्थान नक्की करेल. 
 
पाऊस निभावू शकतो महत्वाची भूमिका
इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत आतापर्यंत पावसाने अनेक सामन्यांचा निकाल ठरवला आहे. जर उर्वरित सामन्यांमध्येही पावसाने व्यत्यय आणल्यास परिस्थिती अजून उत्साहवर्धक होऊ शकते. जर भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या सामन्यात पाऊस पडला तर तर दोन्ही संघांना एक - एक अंक दिला जाईल, ज्यानंतर दोघांचे तीन अंक होतील. यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तानध्ये होणा-या सामन्यात विजयी संघाचे चार अंक होतील आणि तो संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. यानंतर अंतिम चार संघात जाणारा दुसरा संघ रनरेटच्या आधारे ठरवण्यात येईळ. 
 

Web Title: Champions Trophy - For India, Turns out for semi-final or die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.