चॅम्पियन्स ट्रॉफी धोनीचे भविष्य ठरवेल
By admin | Published: March 14, 2017 12:56 AM2017-03-14T00:56:29+5:302017-03-14T00:56:29+5:30
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघापासून दूर असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करीत आहे
कोलकाता : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघापासून दूर असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करीत आहे. मात्र, त्याचे खेळाडू म्हणून भवितव्य चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरच ठरेल, असे वक्तव्य धोनीचे बालपणाचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी केले आहे.
एका १४ वर्षांखालील स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात बॅनर्जी यांनी सांगितले, की सध्या धोनीचे सगळे लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफीकडे लागले आहे. जर या स्पर्धेत तो यशस्वी झाला, तर माझ्या मते तो २०१९च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत नक्की खेळेल.
त्याचप्रमाणे, आयपीएलमध्ये पुणे संघाने कर्णधारपदावरून धोनीला हटविण्याविषयी बॅनर्जी यांनी सांगितले, ‘‘माझ्या मते, हा निर्णय संघमालकांचा आहे. कारण, धोनीकडे या सत्रात केवळ खेळण्याव्यतिरिक्त आणखी कोणताही पर्याय उपलब्ध नाही.’’ (वृत्तसंस्था)
वाढत्या वयासह त्याच जुन्या स्ट्राइक रेटने न खेळता येणे, हे नैसर्गिक आहे. मात्र, इच्छाशक्ती आणि खेळ समजण्याची क्षमता या जोरावर धोनी विशेष ठरतो. चॅम्पियन ट्रॉफीआधी स्वत:ला लयीत राखण्यासाठी तो देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा खेळत आहे.
- केशव बॅनर्जी