मौका हुकला!

By admin | Published: March 27, 2015 02:05 AM2015-03-27T02:05:17+5:302015-03-27T02:05:17+5:30

टीम इंडियाचा विजयी अश्व यजमान आॅस्टे्रलियाने उपांत्य सामन्यातच रोखला आणि तमाम भारतीयांचे वर्ल्डकप आपल्याकडेच ठेवण्याचे स्वप्न भंगले.

Chance missed! | मौका हुकला!

मौका हुकला!

Next

आॅस्ट्रेलिया फायनलमध्ये : टीम इंडियाचे सेमिफायनलमध्येच लोटांगण
‘वुई वोंट गिव्ह इट बॅक’, अशा जोशात गेलेल्या टीम इंडियाने अंतिम सामन्याआधीच वर्ल्डकप यजमानांकडे सोपवला. टीम इंडियाचा विजयी अश्व यजमान आॅस्टे्रलियाने उपांत्य सामन्यातच रोखला आणि तमाम भारतीयांचे वर्ल्डकप आपल्याकडेच ठेवण्याचे स्वप्न भंगले. सिडनीमध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात लोटांगण घालत टीम इंडिया ९५ धावांनी पराभूत झाली.

टीम इंडिया
कुठे कमी पडली?
गोलंदाजी : सलामी जोडी फोडल्यानंतर दुसरी विकेट काढताना टीम इंडियाच्या शिलेदारांना घाम फुटला. शिवाय अखेरच्या ७ षटकांत भारताने ७८ धावांची खैरात केली.
फलंदाजी : ७६ धावांच्या सलामीनंतर भारताने पुढील १५ धावांत आघाडीचे तीन फलंदाज गमावले. त्यानंतर धोनी वगळता कोणीही फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही.
विराट फ्लॉप : चांगल्या सलामीनंतर विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो फ्लॉप ठरला. त्याने एक झेलही सोडला.
रहाणे बाद : धोनीबरोबर ७० धावांची भागीदारी करणाऱ्या रहाणेला पंचांनी नाबाद ठरवले. मात्र आॅस्टे्रलियाने रिव्ह्यू घेताना रहाणेचा बळी मिळवला. तो टर्निंग पॉइंट ठरला.

अनलकी २६ मार्च.... आतापर्यंत २६ मार्चला टीम इंडियाने तीन सामने खेळले. त्या तिन्ही सामन्यातही पराभव पत्करावा लागला. १९८७ साली जमशेदपूरमध्ये ५ विकेट्सने तर २००० साली शारजाहमध्ये ९८ धावांनी टीम इंडियाचा पाकने पराभव केला होता. शुक्रवारी आॅसीने धूळ चारली.

‘आॅसी’चे शिलेदार...
च्स्टिव्हन स्मिथ ९३ चेंडूंत १०५ धावा
च्जेम्स फॉकनर ५९ धावांत ३ बळी
च्मिचेल स्टार्क २८ धावांत २ बळी

बलस्थानावरच मारा... टिच्चून मारा करणारे गोलंदाज हे टीम इंडियाचे वर्ल्डकपमधील महत्त्वाचे अस्त्र होते. मात्र आॅस्ट्रेलियाने याच बलस्थानाला लक्ष्य केले. टीम इंडियाच्या गोलंदाजीला सपाटून मार खावा लागला.

वन-डेतून निवृत्ती नाही
खेळात हार-जीत होतच असते. अजूनही वन-डे खेळायचे आहेत. पुढील वर्ल्डकपबद्दल सांगू शकत नाही, पण टी-टष्ट्वेंटी वर्ल्डकप खेळायचा आहे. त्यामुळे सध्या तरी वन-डेतून निवृत्ती घेणार नाही.
- महेंद्रसिंग धोनी

 

Web Title: Chance missed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.