चंदीला, शाह यांच्या ‘भाग्याचा फैसला’ लांबणीवर

By admin | Published: December 24, 2015 11:49 PM2015-12-24T23:49:42+5:302015-12-24T23:49:42+5:30

फिक्सिंगप्रकरणी दोषी असलेले क्रिकेटपटू अजित चंडीला आणि हिकेन शाह यांच्याबाबतचा निर्णय बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने पाच जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकला आहे

Chandila, Shah's 'Partaa verdict' prolonged | चंदीला, शाह यांच्या ‘भाग्याचा फैसला’ लांबणीवर

चंदीला, शाह यांच्या ‘भाग्याचा फैसला’ लांबणीवर

Next

मुंबई : फिक्सिंगप्रकरणी दोषी असलेले क्रिकेटपटू अजित चंडीला आणि हिकेन शाह यांच्याबाबतचा निर्णय बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने पाच जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकला आहे. त्याआधी चार जानेवारीपर्यंत या दोघांनाही स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाचे उत्तर द्यावे लागेल.
बोर्डाचे अध्यक्ष शशांक मनोहर, ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शाह या तीन सदस्यीय समितीने गुरुवारी क्रिकेट सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत संभाव्य शिक्षेचा निर्णय पाच जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकला.
चंडीला याला २०१३ च्या आयपीएलदरम्यान राजस्थान रॉयल्सचे अन्य दोन सहकारी एस. श्रीसंत आणि अंकित चव्हाण यांच्यासह पोलिसांनी अटक केली होती. श्रीसंत आणि चव्हाण यांच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली. शाहने आयपीएल संघात असलेल्या सहकाऱ्यांसोबत फिक्सिंगबाबत संपर्क केला होता. त्या खेळाडूने ही बाब संघव्यवस्थापनाला कळविली. संघ व्यवस्थापनाने ती बीसीसीआयला कळविली होती. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख रवी सवानी आजच्या बैठकीला हजर होते.
समितीने पाकचे माजी पंच असद रऊफ यांना त्यांच्याविरुद्ध
लागलेल्या आरोपांची शहनिशा करण्यासाठी नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला. रऊफविरुद्ध स्पॉट फिक्सिंगमधील सहभागाचा आरोप आहे. त्यांना पाकमधील १५ सट्टेबाजांसोबतचफरार आरोपी घोषित करण्यात आले होते. रऊफ यांनी स्वत:ला निर्दोष सांगितले असून त्यानंतर ते कधीच भारत दौऱ्यावर आलेले नाहीत. (वृत्तसंस्था)

Web Title: Chandila, Shah's 'Partaa verdict' prolonged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.