चंद्रकांत माळीला कांस्य

By admin | Published: July 31, 2014 04:55 AM2014-07-31T04:55:31+5:302014-07-31T04:55:31+5:30

भारतीय मल्लांना निर्णायक क्षणी अपयश आल्यामुळे २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कुस्ती प्रकारात बुधवारी चार रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले

Chandrakant Mali Bronze | चंद्रकांत माळीला कांस्य

चंद्रकांत माळीला कांस्य

Next

ग्लास्गो : भारतीय मल्लांना निर्णायक क्षणी अपयश आल्यामुळे २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कुस्ती प्रकारात बुधवारी चार रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले. सुशील कुमारच्या मार्गदर्शनात मंगळवारी अमितकुमार आणि विनेश यांनी केलेल्या सुवर्णमय कामगिरीची पुनरावृत्ती सत्यव्रत, बजरंग, ललिता आणि साक्षी यांना करता आली नाही. भारतीय पथकाच्या नजरा आता लंडन आॅलिम्पिकमधील कांस्य विजेता योगेश्वरवर खिळलेल्या आहेत. त्याला गुरुवारी ६६ किलो गटात आव्हान सादर करायचे आहे.
पुरुषांच्या फ्री स्टाईमधील ९७ किलो वजन गटात सत्यव्रतला आणि ६१ किलो वजन गटात बिजनिश बजरंग याला रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले. भारताच्या नवज्योत कौरने ६९ किलो गटात रौप्यपदक जिंकले. ललिताला ५३, तसेच ५८ किलो गटात रौप्यपदक मिळाले.
सत्यव्रतला अंतिम फेरीत कॅनडाचा अर्जुन गिल याने पराभूत केले. सत्यव्रतने दुसऱ्या फेरीत ४-२ अशी आघाडीदेखील घेतली होती. पण, कॅनडाच्या मल्लाने अंतिम सेकंदाला दोन गुण घेताच लढत ४-४ अशी बरोबरीत आली. सुवर्णाचा निर्णय मल्लांना देण्यात आलेल्या क्वॉशन्सच्या आधारे झाला. भारतीय मल्लाला सामन्यादरम्यान अधिक क्वाशन्स मिळाल्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूला सुवर्ण बहाल करण्यात आले, तर सत्यव्रतला रौप्यावर समाधान मानावे लागले. बजरंगने पहिल्या फेरीत इंग्लंडचा साशा मॅडयार्चिक याला १२ गुण मिळवून पराभूत केले. त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये त्याने द. आफ्रिकेचा मार्नो प्लाटझिस याला १२-१ ने चीत केले. सेमिफायनलमध्ये बजरंगने नायजेरियाचा मल्ल एमास डॅनियल याचा ५-२ ने फडशा पाडून अंतिम फेरी गाठली होती. ललिताला अंतिम सामन्यात नायजेरियाची मल्ल ओडूनायो हिने काही सेकंदांत नमविले. साक्षीने अंतिम लढतीत नायजेरियाची एमिनेट एडिनिई हिने पहिल्या राउंडमध्ये दहा गुणांची कमाई करीत सहज पराभूत केले. भारताची नवज्योत कौर हिला मात्र ६९ किलो गटात कास्यपदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)

Web Title: Chandrakant Mali Bronze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.