स्पर्धेचे बदललेले स्वरुप भारतासाठी चांगले

By admin | Published: July 22, 2016 08:08 PM2016-07-22T20:08:19+5:302016-07-22T20:56:24+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये बदलण्यात आलेले स्पर्धेचे स्वरुप भारतासह छोट्या संघांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. थेट उपांत्य फेरी ऐवजी उपांत्यपुर्व फेरी होणार असल्याने प्रत्येक संघाला

Changes in the format of the tournament are good for India | स्पर्धेचे बदललेले स्वरुप भारतासाठी चांगले

स्पर्धेचे बदललेले स्वरुप भारतासाठी चांगले

Next

ओल्टमन्स यांचा विश्वास : रिओ स्पर्धेनिमित्ताने पहिल्यांदाच बदल

बंगळुरु : रिओ आॅलिम्पिकमध्ये बदलण्यात आलेले स्पर्धेचे स्वरुप भारतासह छोट्या संघांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. थेट उपांत्य फेरी ऐवजी उपांत्यपुर्व फेरी होणार असल्याने प्रत्येक संघाला आगेकूच करण्याची समान संधी मिळेल, असे वक्तव्य भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांनी केले.
येथील ‘साई सेंटर’मध्ये बोलताना ओल्टमन्स म्हणाले की, ‘‘जर गटामध्ये अर्जेंटीना, जर्मनी आणि हॉलंड सारखे बलाढ्य संघ असतील, तर अव्वल दोन संघांमध्ये जागा निश्चित करणे खूप कठीण बनते. आगेकूच करणे अशक्य नसते, मात्र जर तुम्ही अव्वल चार संघांमध्ये असाल तर उपांत्यपुर्व फेरीत खेळू शकता. यामुळे भारतासह इतर संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी आत्मविश्वास मिळेल.’’
आॅलिम्पिक सुरु होण्याच्या काही दिवसआधीच हॉकी इंडियाने अनुभवी सरदार सिंगच्या जागी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशची कर्णधार म्हणून निवड केली. याविषयी सरदारवरील दडपण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले असल्याचे सांगताना ओल्टमन्स म्हणाले की, ‘‘सध्य संघ जबरदस्त समतोल बनला आहे. त्यामुळेच सरदार आपल्या खेळावर पुर्णपणे लक्ष केंद्रीत करु शकतो. इतर खेळाडूंनाही संधी मिळावी हेच आमचे ध्येय होते.’’
 ‘‘सरदार, एस. व्ही. सुनील, व्ही. आर. रघुनाथन, मनप्रीत सिंग आणि श्रीजेश हे अनुभवी खेळाडू मिळून कर्णधारांचा समूह तयार करतील. त्यामुळेच हे एक सकारात्मक पाऊल आहे,’’ असेही ओल्टमन्स यांनी सांगितले. दखल घेण्याची बाब म्हणजे रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय संघात लंडन आॅलिम्पिक खेळलेले एकूण ७ खेळाडूंचा समावेश आहे. तर तब्बल नऊ खेळाडू पहिल्यांदाच आॅलिम्पिक खेळतील. त्याचवेळी अनुभवी बचावपटू बीरेंद्र लाकडा याची कमी भारतीय संघाला भासू शकते. अजूनही लाकड गुडघ्याच्या दुखापतीतून सावरु शकला नाही. (वृत्तसंस्था)

लाकडाने रिओ आॅलिम्पिक खेळावे ही माझी इच्छा होती, मात्र हे शक्य नव्हते. तो भारताचा सर्वोत्तम संरक्षकापैकी एक आहे. परंतु, केवळ एकाच खेळाडूवर अवलंबून राहता येणार नाही. आम्ही अझलन शाह कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा लाकडाच्या अनुपस्थितीमध्ये खेळलो. विशेष म्हणजे त्याच्याजागी खेळणाºयांनी चांगली कामगिरी केली आहे.
- रोलंड ओल्टमन्स

रिओ आॅलिम्पिकमच्या निमित्ताने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने स्पर्धेचे स्वरुप बदलले आहे. एकूण १२ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येकी ६ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक संघ आपल्या गटात राऊंड रॉबिनपध्दतीने सामने खेळतील. यानंतर दोन्ही गटातील अव्वल चार संघ उपांत्यपुर्व फेरीसाठी पात्र ठरतील.

Web Title: Changes in the format of the tournament are good for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.