परिस्थितीनुसार क्रीडाधोरणात बदल गरजेचा- राही सरनोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 01:01 AM2018-10-24T01:01:45+5:302018-10-24T01:01:54+5:30

राज्याचे क्रीडाधोरण एकदाच तयार होते, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईपर्यंत मैदान, घरची, शैक्षणिक जीवनातील परिस्थिती सतत बदलत असते.

Changes need to change in the game - Rahi Sarnobot | परिस्थितीनुसार क्रीडाधोरणात बदल गरजेचा- राही सरनोबत

परिस्थितीनुसार क्रीडाधोरणात बदल गरजेचा- राही सरनोबत

Next

पुणे : राज्याचे क्रीडाधोरण एकदाच तयार होते, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईपर्यंत मैदान, घरची, शैक्षणिक जीवनातील परिस्थिती सतत बदलत असते. त्याला कोणत्यावेळी कोणते सहकार्य लागेल, कोणीच सांगू शकत नाही. क्रीडाधोरण एकदाच तयार होते. नंतर ते अनेक वर्षे अमलात येते आणि त्या अनुषंगाने क्रीडाखाते चालते. काळानुसार धोरणात बदल करणे आवश्यक असल्याचे मत आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णकन्या राही सरनोबतने व्यक्त केले.
जकार्ता-इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीड स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या पदकविजेत्या खेळाडूंचा पारितोषिक वितरण समारंभ क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मंगळवारी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये पार पडला, त्यावेळी राही बोलत होती.
राही म्हणाली, की शूटिंग खेळासाठी मागील १२ वर्षे क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून राज्य शासनाने मला मदत केलेली असल्यामुळे, मी हा खेळ सुरू ठेवू शकले. याशिवाय तिने शिवछत्रपती क्रीडा संकुल स्पोटर््स सायन्स सेंटर अद्ययावत करून, त्या ठिकाणी तज्ज्ञ व्यक्तींची सेवा उपलब्ध करून दिल्यास राज्यतील सर्व खेळाडूंना नक्की त्याचा फायदा होईल, असे नमूद केले.
यावेळी क्रीडामंत्री विनोद तावडे म्हणाले, की युवा पिढीने मोबाईल आणि सोशल मीडियामधून बाहेर येणे गरजेचे आहे. जेव्हा युवा पिढी बाहेर येऊन मैदानावर उतरेल, तेव्हा खरे क्रीडाधोरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल.
यावेळी सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूस ५० व त्यांच्या मार्गदर्शकास १२ लाख, रौप्यपदक प्राप्त करणाºया खेळाडूस ३० व त्यांच्या मार्गदर्शकास ७ लाख व कांस्यपदक प्राप्त करणाºया खेळाडूस २० व त्यांच्या मार्गदर्शकास ५ लाख रुपये देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार उपस्थित होते. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच क्रीडाप्रेमी व युवक सेवा संचालनालयामधील अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राही जीवन सरनोबत, कोल्हापूर व त्यांचे मार्गदर्शक रौनक अशोक पंडित, दत्तू बबन भोकनळ, नाशिक व मार्गदर्शक अश्विनी कुंडलिक बोºहाडे, सायली संजय केरीपाळे, पुणे व मार्गदर्शक राजेश ढमढेरे, सोनाली विष्णू शिंगटे, मुंबई व मार्गदर्शक राजेश राजाराम पाडावे, श्वेता प्रभाकर शेरवेगार, मुंबई व मार्गदर्शक अमिश वेद, वर्षा गौतम व मार्गदर्शक अमिश वेद, रिशांक कृष्णा देवाडिगा, मुंबई व मार्गदर्शक सुनील मारुती अडके, गिरीश मारुती इरनक, ठाणे व मार्गदर्शक संतोष हरिभाऊ पडवळ, हीना सिद्घू, मुंबई व मार्गदर्शक रौनक अशोक पंडित, महेश मानगावकर, मुंबई व मार्गदर्शक मृणाल रॉय यांना गौरविण्यात आले.

Web Title: Changes need to change in the game - Rahi Sarnobot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.