चॅपेल रिंगमास्टरसारखे वागायचे

By admin | Published: November 4, 2014 01:41 AM2014-11-04T01:41:44+5:302014-11-04T01:41:44+5:30

२00५ ते २00७ या काळात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेले ग्रेग चॅपेल हे रिंगमास्टर प्रमाणे वागायचे.आपले म्हणणे खेळाडूंवर लादत आणि त्यांचे म्हणणे ऐकूण घेत नव्हते

Chappell looked like a ringmaster | चॅपेल रिंगमास्टरसारखे वागायचे

चॅपेल रिंगमास्टरसारखे वागायचे

Next

नवी दिल्ली : २00५ ते २00७ या काळात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेले ग्रेग चॅपेल हे रिंगमास्टर प्रमाणे वागायचे. आपले म्हणणे खेळाडूंवर लादत आणि त्यांचे म्हणणे ऐकूण घेत नव्हते, त्यांनी द्रवीडला हटवून आपणाला कर्णधार करण्याचे आमिष दाखविले होते, असा बाउन्सर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आपल्या फ्लेर्इंग इट माय वे या आगामी आत्मचरित्रात टाकला आहे. या पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन होत आहे.
सचिनने या पुस्तकात म्हंटले आहे की, २00७ साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी काही महिने अगोदर चॅपेल माझ्या घरी आले. ते म्हणाले की, ‘‘राहुल द्रवीड कर्णधारपदासाठी योग्य व्यक्ती नाही. त्याला या पदावरुन हटवून त्याच्या जागी तुझी निवड करण्यास मी तुला मदत करु शकतो. असे झाले तर आपण दोघे भारतीय क्रिकेटवर राज्य करु.’’
सचिन लिहितो की, त्यांचा हा प्रस्ताव ऐकून मी आणि पत्नी अंजली दोघेही स्तब्धच झालो. क्रिकेटचा वर्ल्डकप काही दिवसांवर आला असताना कर्णधाराविषयी प्रशिक्षकाची भावना पाहून आम्ही हैराण झालो होतो.
सचिन म्हणतो की, अर्थातच त्यांच्या या प्रस्तावाला मी नकार दिला. जवळजवळ दोन तास मला समजावण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर चॅपेल निघून गेले.
भारतीय संघासोबतही त्यांची वागणूक चांगली नसल्याचे सचिनने पुस्तकात म्हंटले आहे. तो म्हणतो चॅपेल हे रिंगमास्टरसारखे वागायचे. खेळाडूंचे म्हणणे ते ऐकून घेत नसत, उलट त्यांच्यावर आपले म्हणणे थोपवित असत.
चॅपेल यांच्या सुचनेमुळे मी खूप नाराज झालो होतो. त्यावेळी मी बीसीसीआयला सुचना केली होती की, वर्ल्डकपला संघासोबत चॅपेल यांना पाठवू नका. संघातील वरिष्ठ खेळाडू संघावर नियंत्रण ठेवतील. पण माझे म्हणणे बीसीसीआयने ऐकले नाही. चॅेपेल यांना संघाबरोबर पाठविले. २00७च्या वर्ल्डकप मोहीमेचा भयावह अंत झाला. भारतीय संघाला पात्रता फेरीतूनच बाहेर पडावे लागले. संघ श्रीलंका आणि बांगलादेशकडून पराभूत झाला आणि केवळ बर्म्युडा संघाविरुध्दच जिंकला.

Web Title: Chappell looked like a ringmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.