तिकीट वाटपात अपारदर्शीपणाचा गांगुलीवर आरोप
By admin | Published: February 7, 2017 02:31 AM2017-02-07T02:31:37+5:302017-02-07T02:31:37+5:30
भारत-इंग्लंड दरम्यान २२ जानेवारीला झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या तिकिटांच्या वाटपामध्ये पारदर्शकपणा ठेवण्यात आलेला नव्हता
कोलकाता : भारत-इंग्लंड दरम्यान २२ जानेवारीला झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या तिकिटांच्या वाटपामध्ये पारदर्शकपणा ठेवण्यात आलेला नव्हता, असा आरोप बंगाल क्रिकेट संघटनेचे (कॅब) माजी खजिनदार विश्वरुप डे यांनी केला. त्यांनी अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या नेतृत्वाखालील समितीवर याप्रकरणी टीका केली.
डे यांनी एका संमेलनामध्ये गांगुलीवर टीका केली. त्यांनी गांगुली आणि ट्रस्टी बोर्ड चेअरमन आणि बीसीसीआयचे माजी संयुक्त सचिव गौतम दासगुप्ता यांच्यावर तिकीट वाटपप्रकरणी पारदर्शीपणा न ठेवल्याचा आरोप लावला. क्रिकेट प्रशासनामध्ये नऊ वर्षे कारकीर्द राहिल्यानंतर डे यांना कॅबबाहेर पडावे लागले. डे यांनी आरोप लावला की, दासगुप्ता व सहकाऱ्यांनी अनधिकृतपणे डे यांच्यासाठी ‘कॉम्प्लिमेंटरी तिकीट’ राखून ठेवले नाही. गांगुलीने या आरोपाचे खंडन केले असून, ईडन गार्डनवर सामन्याचे आयोजन केले जाते, तेव्हा डे यांना नेहमी प्रत्येक सामन्यासाठी २०० ते ३०० तिकीट मिळतात, असे सांगितले.