पुण्याचे मुंबईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान

By admin | Published: May 16, 2017 09:55 PM2017-05-16T21:55:52+5:302017-05-16T21:56:52+5:30

आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळविण्याच्या इराद्याने मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जाएंट्स हे महाराष्ट्राचे दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत

Chasing 163 to beat Mumbai Pune | पुण्याचे मुंबईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान

पुण्याचे मुंबईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळविण्याच्या इराद्याने मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जाएंट्स हे महाराष्ट्राचे दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत. नाणेफेकीचा कौल गमावून प्रथम फलंदाजी करताना पुणे संघाने निर्धारीत 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 162 धावा करत मुंबई समोर विजयासाठी 163 धावांचे आव्हान ठेवले आहे. पुण्याकडून अजिंक्य रहाणे, मनोज तिवारी आणि धोनीने उपयुक्त खेळी केली.
पुण्याची सुरुवात अतिशय निराशजनक झाली. पहिल्या षटकात मॅकलेघनने त्रिपाठीला बाद केले तर दुसऱ्य़ा षटकात कर्णधार स्मिथ मलिंगाचा शिकार झाला. दोन षटकानंतर 12 धावा फलकावर लागल्या होत्या आणि आघाडीचे दोन फलंदाज बाद झाले होते. संघाची कुमकुवत अवस्था असताना अजिंक्य रहाणेने जिगरबाज खेळी करताना संघाला सावरले. यादरम्यान त्याने आपले वैयक्तिक अर्धशतक केले . रहाणेने 43 चेंडूत 56 धावांची खेळी केली. मनोज तिवारीने 48 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. एम.एस. धोनीने डेथ ओव्हरमध्ये दमदार फटकेबाजी करताना 25 चेंडूत 40 धावा केल्या . यामध्ये धोनीने पाच षटकार लगावले. मुंबईकडून मलिंगा, कर्ण शर्मा आणि मॅकलेघन यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

Web Title: Chasing 163 to beat Mumbai Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.