गुजरातला ३१२ धावांचे आव्हान

By admin | Published: January 14, 2017 01:25 AM2017-01-14T01:25:49+5:302017-01-14T01:25:49+5:30

दुसऱ्या डावात बहरलेल्या फलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४११ धावांची मजल मारून

Chasing 312 for Gujarat | गुजरातला ३१२ धावांचे आव्हान

गुजरातला ३१२ धावांचे आव्हान

Next

इंदूर : दुसऱ्या डावात बहरलेल्या फलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४११ धावांची मजल मारून गुजरातला विजयासाठी ३१२ धावांचे कठीण आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर गुजरातने बिनबाद ४७ अशी सुरुवात केली.
चौथ्या दिवशी ३ बाद २०८ धावसंख्येवरून सुरुवात करताना मुंबईने आक्रमक पवित्रा घेतला. अष्टपैलू अभिषेक नायरने पुन्हा एकदा मुंबईसाठी महत्त्वपूर्ण खेळी करताना १४६ चेंडंूत ५ चौकार व ५ षट्कारांसह ९१ धावांची खेळी केली. कर्णधार आदित्य तरेनेही सावधपणे खेळताना ११४ चेंडंूत १२ चौकारांसह ६९ धावांची खेळी केली. यादव आणि तरे बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना फारशी चमक दाखविता आली नाही. पुन्हा एकदा सिद्धेश लाड (१५) अपयशी ठरला, तर, बलविंदर संधू (२०), शार्दुल ठाकूर (१) आणि विशाल दाभोळकर (१२) दडपणाखाली बाद झाले.
चिंतन गजाने मुंबईकरांच्या फलंदाजीला खिंडार पाडताना १२१ चेंडूंत सहा बळी घेतले. आरपी सिंगने दोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली, तर रुष कलारिया आणि हार्दिक पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
यानंतर, मोठ्या धावसंख्येचे आव्हान घेऊन उतरलेल्या गुजरातने चांगली सुरुवात केली. समित गोहेल याने सावध भूमिका घेत खेळपट्टीवर टिकून राहण्यावर भर दिला. दुसऱ्या बाजूने प्रियांक पांचाळने खराब चेंडूंचा चांगला समाचार घेताना गुजरातचा धावफलक हलता ठेवला. या दोघांच्या जोरावर गुजरातने चौथ्या दिवअखेर १३.२ षटकांत बिनबाद ४७ धावांची मजल मारली. खेळ थांबला तेव्हा गोहेल (८*) आणि पांचाळ (३४*) नाबाद होते. गुजरातला आपल्या पहिल्या रणजी विजेतेपदासाठी आणखी २६५ धावांची आवश्यकता आहे. (वृत्तसंस्था)
धावफलक-
मुंबई (पहिला डाव) : ८३.५ षटकात सर्वबाद २२८ धावा.
गुजरात (पहिला डाव) : १०४.३ षटकांत सर्वबाद ३२८ धावा.
मुंबई (दुसरा डाव) : ३ बाद २०८ धावांपासून पुढे सूर्यकुमार यादव झे. पार्थिव गो. कलारिया ४९, आदित्य तरे पायचीत गो. हार्दिक पटेल ६९, सिध्देश लाड झे. गांधी गो. सिंग १५, अभिषेक नायर पायचीत गो. सिंग ९१, बलविंदर संधू झे. जुनेजा गो. गजा २०, शार्दुल ठाकूर झे. केपी पटेल गो. गजा १, विशाल दाभोळकर झे. गोहेल गो. गजा १२, विजय गोहिल नाबाद ०. अवांतर - १३७.१ षटकांत सर्वबाद ४११ धावा.
गोलंदाजी : आरपी सिंग २९.१-८-८३-२; रुष कलारिया २५-११-६३-३; चिंतन गजा ३९-१०-१२१-६; भार्गव मेराई ६-३-१६-०; हार्दिक पटेल २८-२-८९-१; रुजुल भट १०-०-३९-०.
गुजरात (दुसरा डाव) : समित गोहेल खेळत आहे ८, प्रियांक पांचाळ खेळत आहे ३४. अवांतर - ५. एकूण : १३.२ षटकात बिनबाद ४७ धावा.
गोलंदाजी : शार्दुल ठाकूर ५.२-१-१७-०; बलविंदर संधू ५-१-१९-०; विजय गोहिल २-१-२-०; अभिषेक नायर १-०-४-०.

Web Title: Chasing 312 for Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.