बांग्लादेशला ३१८ धावांचे आव्हान
By admin | Published: June 24, 2015 06:20 PM2015-06-24T18:20:41+5:302015-06-24T18:37:41+5:30
बांग्लादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमवल्यानंतर अडचणीत आलेल्या भारतीय संघाने बांग्लादेशला ५० षटकात ३१८ धावांचे आव्हान दिले आहे.
Next
>ऑनलाइन टीम
मीरपूर, दि. २४ - बांग्लादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमवल्यानंतर अडचणीत आलेल्या भारतीय संघाने बांग्लादेशला ५० षटकात ३१८ धावांचे आव्हान दिले आहे. तिस-या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या फलंदाजानी चांगली कामगिरी करत ५० षटकात सहा बाद ३१७ धावा केल्या.
या सामन्यात भारतीय फलंदाज शिखर धवनने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ७३ चेंडूत १० चौकार लगावत ७५ धावा केल्या, त्याला गोलंदाज मशरफी मूर्तजाने झेलबाद केले. तर, त्यापाठोपाठ आलेल्या महेंद्रसिंग धोणीने दमदार सुरुवात करत ७६ चेंडूत एक षटकार आणि सहा चौकारांचा मारा करत ६९ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाची धावसंख्या भक्कम होत गेली. महेंद्रसिंग धोणीलाही गोलंदाज मशरफी मूर्तजाने झेलबाद केले. याआधी अंबाती रायडू (४४) विराट कोहली (२५), रोहित शर्मा (२९) आणि सुरेश रैना ३८ धावांवर बाद झाला. त्यानंतर स्टुअर्ट बिन्नीने नाबाद ९ चेंडूत दोन चौकारासह १५ धावा केल्या, तर अक्षर पटेलने शेवटच्या षटकात एक षटकार लगावत नाबाद १० धावा केल्या.
बांग्लादेशकडून गोलंदाज मशरफी मूर्तजाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतले, तर मुस्तफिजूर रहमानने दोन आणि साकिब हसनने एक विकेट घेतला.