चेन्नई पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक

By admin | Published: May 10, 2015 04:24 AM2015-05-10T04:24:38+5:302015-05-10T04:24:38+5:30

आधीच्या लढतीत पराभूत झालेल्या चेन्नई सुपरकिंग्सला रविवारी आयपीएल-८ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाची परतफेड करायची आ

Chennai look forward to defeating defeat | चेन्नई पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक

चेन्नई पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक

Next

चेन्नई : आधीच्या लढतीत पराभूत झालेल्या चेन्नई सुपरकिंग्सला रविवारी आयपीएल-८ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाची परतफेड करायची आहे; शिवाय विजयासह अव्वल स्थानदेखील भक्कम करण्याची इच्छा आहे.
सलग तीन विजयांसह चेन्नईने सुरुवात केली. १९ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सने त्यांची विजयी वाटचाल थोपविली होती. दोन वेळच्या चॅम्पियन संघाने मात्र पराभवाने खचून न जाता पुढील चार सामने ओळीने जिंकले. त्यानंतर कोलकाता आणि हैदराबादकडून पराभवाचे धक्के बसले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला नमवून चेन्नईने पुनरागमन केले; पण पुन्हा मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा धक्का बसला. महेंद्रसिंंह धोनीच्या नेतृत्वाखालील हा संघ उद्या रॉयल्सला नमवीत विजयीपथावर येण्यास इच्छुक वाटतो.
दुसरीकडे राजस्थानने सुरुवातीचे पाच सामने जिंकल्यानंतर २१ एप्रिल रोजी किंग्स पंजाबकडून पराभवाचे तोंड पाहिले; नंतर आरसीबीनेही त्यांचा पराभव केला. याशिवाय, आरसीबी आणि केकेआरविरुद्धचे सामने पावसात वाहून गेले. ३ मे रोजी झालेल्या सामन्यात या संघाने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव केला; पण सनरायजर्स हैदराबादने त्यांचा पराभव केला. १२ सामन्यांत ६ विजय
नोंदवीत राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे. उद्या विजयासह त्यांचे ‘प्ले आॅफ ’ निश्चित होईल.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने ११ पैकी ७ सामने जिंकले. दोन वेळचा विजेत्या चेन्नईकडे ब्रँडन मॅक्युलम आणि ड्वेन स्मिथ हे सलामीवीर आहेत. मधल्या फळीत सुरेश रैना, फाफ डु प्लासिस आणि स्वत: धोनी आहे. सध्याच्या पर्वात चेन्नईचा मारा प्रभावी ठरला आहे. आशिष नेहरा आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी १७ बळी घेत अव्वल स्थान गाठले. मोहित शर्मा, फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि पवन नेगी यांनी आपापले काम चोखपणे बजावले. आयपीएलच्या पहिल्या सत्रातील विजेत्या राजस्थानकडे सलामीवीर अजिंक्य रहाणे हा हुकमी खेळाडू आहे. आॅरेंज कॅपचा मानकरी असलेल्या या खेळाडूला साथ देण्यासाठी स्टीव्ह स्मिथ आणि वॉटसन आहेतच. संजू सॅमसन व करुण नायर हेदेखील धावा काढू शकतात. गोलंदाजीत टिम साऊदी, धवल कुलकर्णी आणि वाटसन हे उपयुक्त असून, प्रवीण तांबे आणि जेम्स फॉल्कनर हे मधल्या षटकामध्ये फलंदाजांवर अंकुश ठेवण्याचे काम यशस्वीपणे करू शकतात. (वृत्तसंस्था)

Web Title: Chennai look forward to defeating defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.