चेन्नई ओपन : सोमदेवला कठीण ‘ड्रॉ’

By Admin | Published: January 4, 2015 01:27 AM2015-01-04T01:27:19+5:302015-01-04T01:27:19+5:30

खराब फॉर्ममध्ये असलेला भारताचा एकेरीतील टेनिसपटू सोमदेव देवबर्मन याला चेन्नई ओपनमध्ये कठीण ड्रॉ मिळाला आहे.

Chennai Open: Somdev calls tough 'draw' | चेन्नई ओपन : सोमदेवला कठीण ‘ड्रॉ’

चेन्नई ओपन : सोमदेवला कठीण ‘ड्रॉ’

googlenewsNext

चेन्नई : खराब फॉर्ममध्ये असलेला भारताचा एकेरीतील टेनिसपटू सोमदेव देवबर्मन याला चेन्नई ओपनमध्ये कठीण ड्रॉ मिळाला आहे. त्याची सलामी लढत जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानावर असलेला सहावा मानांकित येन सून लू याच्याविरुद्ध होईल.
वाईल्ड कार्डने प्रवेश मिळविणारा सोमदेव २०१४ मध्ये खराब खेळ केल्याने १३८ व्या स्थानावर घसरला. सोमदेव आणि तायपेईचा त्याचा प्रतिस्पर्धी यांच्यात ज्या तीन लढती झाल्या त्या तिन्ही लढती सोमदेवने जिंकल्या हे विशेष. पण यावेळी आव्हान कठीण झाले आहे.
सोमदेव म्हणाला,‘ हा ड्रॉ कठीण आहे. येनने यंदा चांगल्या कामगिरीच्या बळावर पहिल्या ४० खेळाडूंमध्ये स्थान पटकावले. मी दोहा येथे त्याच्यासोबत सराव केला. तो अवघड प्रतिस्पर्धी आहे. वाईल्ड कार्डद्वारे मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळविणारा भारताचा आणखी एक टेनिसपटू रामकुमार रामनाथन याला सलामीला जपानचा तत्सुमा इतो याच्याविरुद्ध झुंज द्यावी लागेल. दरम्यान अव्वल मानांकित आणि गतविजेता तसेच चौथ्या स्थानावरील खेळाडू स्वित्झर्लंडचा स्टान वावरिंका याला पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली.
याशिवाय दुसरा मानांकित फेलिसियानो लोपेझ,तिसरा मानांकित रॉबर्टो वॉटिस्टा, आणि चौथा मानांकित डेव्हिड गोफिन
यांनाही पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली.(वृत्तसंस्था)

युकी, जीवन पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत
युकी भांबरी आणि जीवन नेंदुचेझियन यांनी एटीपी चेन्नई ओपनच्या पात्रता फेरीत पहिला अडथळा पार केला. भांबरीने पहिल्या फेरीच्या सामन्यात सिद्धार्थ रावतला ६-१, ६-३ ने आणि जीवनने लक्षित सूद याला ६-२, ६-२ ने पारभतू केले. भारताचा विनायक काझा हा देखील दुसऱ्या फेरीत दाखल झाला. त्याने थायलंडचा दानाई याचा २-६, ६-४, ६-२ ने पराभव केला. साई मुकुंदने फहाद मोहम्मदचा ६-३, ६-४ ने, विष्णू वर्धनने सूरज प्रबोधचा ६-१, ६-३ ने पराभव केला.

Web Title: Chennai Open: Somdev calls tough 'draw'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.