चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा झटका
By admin | Published: August 28, 2015 01:23 AM2015-08-28T01:23:10+5:302015-08-28T01:23:10+5:30
आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी दोन वर्षांसाठी निलंबित झालेल्या चेन्नई सुपर किंग्सला मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.
चेन्नई : आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी दोन वर्षांसाठी निलंबित झालेल्या चेन्नई सुपर किंग्सला मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.
सर्वोच्च न्यायालयाने फिक्सिंगच्या तपासासाठी माजी मुख्य न्या. आर. एम. लोढा समिती नेमली होती. या समितीने आपल्या निर्णयास चेन्नई आणि राजस्थान रॉयल्सला दोन वर्षांसाठी निलंबित केले. या निर्णयावर स्थगिती मागण्यासाठी सीएसकेने हायकोर्टात दाखल केलेली याचिका आज फेटाळण्यात आली आहे.
मुख्य न्या. संजय किशन कौल आणि न्या. टी. एस. शिवागनम यांच्या खंडपीठाने या प्रकरणी पुढील सुनावणी २३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. या दरम्यान बीसीसीआयद्वारे घेण्यात येणारा कुठलाही निर्णय कोर्टाच्या अंतरिम आदेशावर विसंबून असेल. बीसीसीआयच्या कार्यसमितीची उद्या दि. २८ येथे बैठक होत आहे. या बैठकीत चेन्नई आणि राजस्थान यांच्या निलंबनाविषयी चर्चा करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)